मारुतीच्या `या` गाड्यांना मोठी मागणी, कमी किंमतीत शानदार फीचर्स
देशातील सर्वात मोठी कार कंपनी Maruti Suzuki India Limited (MSI) ची ऑगस्ट 2022 मध्ये एकूण विक्रीत 26.37 टक्के वाढ झाली असून, कंपनीच्या कारची एकूण विक्री 1,65,173 युनिट्सवर पोहोचली आहे.
Maruti Suzuki Car Sales Report : मारुती सुझुकी देशातली पहिल्या क्रमांकाची वाहन उत्पादक कंपनी आहे. यामध्ये मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSI) ची ऑगस्ट 2022 मध्ये एकूण विक्रीत 26.37 टक्के वाढ झाली. ज्यामुळे कंपनीच्या कारची एकूण विक्री 1,65,173 युनिट्स झाली. त्याच वेळी, मारुती सुझुकीने ऑगस्ट 2021 मध्ये एकूण 1,30,699 वाहनांची विक्री केली.
मारुती सुझुकीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये देशांतर्गत बाजारात तिची विक्री 30 टक्क्यांनी वाढली असून विक्रीचा आकडा 1,34,166 युनिट्सवर पोहोचला आहे. त्याच वेळी, वर्षभरापूर्वी याच महिन्यात हा आकडा 1,03,187 युनिट्स इतका होता.
सर्वाधिक विक्री होणाऱ्या कॉम्पॅक्ट कार
बलेनो, सेलेरिओ, डिझायर, इग्निस, स्विफ्ट, टूर एस आणि वॅगनआर यांची विक्री ऑगस्ट 2022 मध्ये 57 टक्क्यांनी वाढून 71,557 युनिट्स झाली आहे. जी एका वर्षापूर्वी याच महिन्यात 45,577 युनिट्स होती. त्याच वेळी, अल्टो आणि एस-प्रेसोसह लहान कार श्रेणीची विक्रीत ऑगस्ट 2021 मध्ये 20,461 युनिट्सवरून गेल्या महिन्यात 22,162 युनिट्सपर्यंत वाढली. ऑगस्टमध्ये त्यांनी 21,481 वाहनांची निर्यात केली आहे. जी एका वर्षापूर्वी याच महिन्यात 20,619 वाहनांची होती, अशी माहिती मारुती सुझुकीकडून देण्यात आली आहे.
वाचा : भारताने करून दाखवलं, ब्रिटनला मागे टाकत महासत्ताक देशांच्या 'या' यादीत
तर दुसरीकडे ऑगस्ट 2022 मध्ये टाटा मोटर्सची एकूण विक्री 36 टक्क्यांनी वाढून 78,843 युनिट्स झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने 57,995 मोटारींची विक्री केली होती. ऑगस्टमध्ये टाटा मोटर्सची एकूण देशांतर्गत विक्री 41 टक्क्यांनी वाढून 76,479 युनिट्स झाली. कंपनीने ऑगस्ट 2021 मध्ये डीलर्सना 54,190 युनिट्स पाठवले होते. गेल्या महिन्यात देशांतर्गत बाजारपेठेत प्रवासी वाहनांची विक्री 68 टक्क्यांनी वाढून 47,166 युनिट्सवर गेली आहे. एका वर्षापूर्वी हा आकडा 28,018 युनिट्स होता.