ट्विटर खात्यांच्या हॅकिंगबद्दल सावध राहा, अशी घ्या काळजी
सध्या लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्हेगारांनी ट्विटर अकाउंट हॅकिंगबाबत एक नवीन प्रकारचा गुन्हा करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई : सध्या लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्हेगारांनी ट्विटर अकाउंट हॅकिंगबाबत एक नवीन प्रकारचा गुन्हा करण्यास सुरुवात केली आहे. जगातील दिग्गज व्यक्तींचा अकाउंट हॅक करण्यात आलेली आहेत. त्यामुळे सावध राहा, असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे. त्याचवेळी काही उपाय-योजना करण्याचा सल्लाही दिला आहे. यात पासवर्ड बदला तसेच ट्विटर येणाऱ्या व कोणत्याही सेलिब्रिटी किंवा blue tick verified अकाउंटने एखादी बातमी ट्विट केली तर आंधळेपणाने ती retweet करू नका आधी या बातमीची खातरजमा करून घ्या.
हॅकरनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा, बिल गेट्स, जेफ बेझो, उबेर व ॲपल कंपन्यांची ट्विटर अकाउंट्स हॅक केली आहेत. तसेच या व्यक्तींच्या नावाचे ट्विट पाठवून काही ठराविक रक्कम इनाम म्हणून पण जाहीर करण्यात आली आहे. तसेच हॅक झालेल्या अकाउंट्स वरून काही फेक लिंक्स पण टाकण्यात आल्या होत्या ज्या अन्वये सायबर भामट्यांच्या खात्यात साधारणपणे १.२ लाख डॉलर किमतीच्या बिटकॉईन्स जमा करून घेतल्याचा अंदाज आहे, अशा बातम्या सर्व समाज माध्यमांवर फिरत आहेत.
हा सर्व प्रकार साधारणतः भारतीय प्रमाण वेळेनुसार १६ जुलै २०२० च्या मध्यरात्री ०१:३० वाजता घडला व त्यामुळे ट्विटरचे काही features व सोयी काही ठराविक काळाकरिता उपलब्ध नव्हत्या. ट्विटर support नी हा प्रकार ओळखून याबाबत योग्य उपाय योजना आणि तांत्रिक खबरदारी घेऊन हा प्रकार अजून जास्त प्रमाणात वाढण्यापासून थांबविला.
या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मागोवा घेतला. आणि महाराष्ट्र सायबरने या संदर्भात ट्विटर इंडियाला लगेच सूचना दिल्या आहेत की, त्यांनी भारतातील सर्व नागरिकांच्या, महत्त्वाच्या व्यक्तींचे व संस्थांचे अधिकृत blue tick ट्विटर अकाउंट्स व त्या अकाउंट मधील सर्व डेटा व त्या अकाऊंटची privacy ची काळजी घ्यावी व त्याकरिता त्यांनी आवश्यक ते तांत्रिक बदल आपल्या सायबर सुरक्षा प्रणालीमध्ये करून घ्यावे. कोरोना महामारीच्या काळात आधीच तणावपूर्ण वातावरण असताना असे काही प्रकार घडू नयेत. जर कोणत्याही अकाउंटवरून काही चुकीची माहिती प्रसारित झाली तर त्यामुळे राज्यात गोंधळ पसरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
तसेच अशाच प्रकारच्या माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० कलम ७९(३)(बी) अन्वये नोटीस महाराष्ट्र सायबरने अन्य सोशल मीडिया platforms(Facebook, whatsapp, instagaram etc) ना पण पाठवून त्यांना ही सर्व नागरिकांच्या प्रोफाईल व डेटा व privacy ची सुरक्षा राखण्याबाबत सांगितले आहे .
नागरिकांना आवाहन
- कृपया आपल्या ट्विटर व अन्य सोशल मिडिया अकाउंट्सचा पासवर्ड नियमितपणे बदलत राहा.
- ट्विटर येणाऱ्या व कोणत्याही सेलिब्रिटी किंवा blue tick verified अकाउंटने एखादी बातमी ट्विट केली तर आंधळेपणाने ती retweet करू नका आधी सदर बातमीची खातरजमा करून घ्या .
- कोणत्याही सेलिब्रिटी किंवा blue tick verified अकाउंटवरून जर काही मेसेज किंवा काही पैसे मिळतील अशा संदर्भात कोणती scheme किंवा offer आली तर त्यावर विश्वास ठेवून क्लिक करु नका.