Biggest ola Season Sale: येत्या 5 वर्षात रस्त्यांवर पेट्रोलच्या गाड्यांऐवजी इलेक्ट्रीक स्कूटर धावताना दिसू लागतील. याची सुरुवात झाली आहे. तरी चार्जिंग आणि सर्व्हिस सेंटरच्या तक्रारींमुळे कोणी इलेक्ट्रीक स्कूटर खरेदीसाठी धजावत नाही. या पार्श्वभूमीवर ओला इलेक्ट्रीकने आपली सर्वात सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक स्कूटर S1X वर मोठ्या डिस्काऊंटची घोषणा केली आहे. कंपनीने या स्कूटरवर 25 हजारांचा भलामोठा डिस्काऊंट दिलाय. बिगेस्ट ओला सिझन सेलमध्ये  S1X  इलेक्ट्रीक का इतकी स्वस्त झालीय? लोकांच्या यावर प्रतिक्रिया काय आहेत? सविस्तर जाणून घ्या. 


स्टॉक संपेपर्यंत ऑफर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओला S1X इलेक्ट्रीक स्कूटरची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत 75 हजार रुपये होती. ही ऑफर केवळ S1X  मॉडेलच्या 2 kWh बॅटरी व्हेरिएंटवर आहे. या ऑफरची शेवटची तारीख देण्यात आली नाही.  स्टॉक संपेपर्यंतच ही ऑफर असेल. त्यामुळे ज्यांना ही स्कूटर घ्यायची इच्छा असेल त्यांनी तात्काळ संधीचा फायदा घ्यायला हवा. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कधीही ऑफर समाप्त केली जाऊ शकते. 


कंपनीच्या सेल्समध्ये मोठी घसरण 


ओला इलेक्ट्रीक्सच्या सप्टेंबरच्या सेल्समध्ये खूप घसरण झाली. S1X इलेक्ट्रीक स्कूटरवर मोठा डिस्काऊंट देऊन फेस्टिव्हल सिझनमध्ये सेल्स वाढवण्याचा कंपनीचा प्लान आहे. ओलाने सप्टेंबर 2024 मध्ये वर्षातील कमी विक्री नोंदवण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये ओला स्कूटरचे केवळ 23 हजार 965 यूनिट्सच विकले गेले. यामुळे सप्टेंबरमध्ये कंपनीचा मार्केट शेअर 49 टक्क्यांहून कमी होऊन 27 टक्क्यांवर आला आहे. 



स्पर्धकांकडून मोठी टक्कर 


भारतातील सर्वात जास्त विक्री होणारी इलेक्ट्रीक स्कूटर ब्राण्ड असूनही ओला इलेक्ट्रीकला टीव्हीएस आणि बजाज चेतक सारख्या निर्मात्यांकडून मोठी स्पर्धा मिळतेय. या कंपन्या बाजारात आपली पकड मजबूत करताना दिसतेय. ओला स्कूटरसंदर्भात खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या.


ग्राहक संतप्त 


ओला इलेक्ट्रीक स्कूटरच्या सेलवरी पोस्टवर सोशल मीडियात खूप प्रतिक्रिया येत आहेत. यात ग्राहक संतापलेले दिसत आहेत. एक यूजर्स म्हणतो 9,999 रुपयांना दिलात तरी ही स्कूटर नको. दुसरा यूजर म्हणतो 99 रुपयांना देत असाल तर सांगा. अनेकजण स्कूटरमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे नाराज आहेत. जवळ सर्व्हिंग सेंटर उपलब्ध नसल्याने ग्राहकांची चिडचिड होत आहे. एका रिपोर्ट्सनुसार कंपनीला दरमहा 80 हजार तक्रारी येत आहेत. ज्यामध्ये कस्टमर सर्व्हिसला उशीर आणि स्कूटरची खराब क्वालिटीच्या तक्रारी सर्वाधिक आहेत.