बाईकची टाकी नेहमी फूल ठेवल्याने मिळतो जबरदस्त मायलेज? उत्तर ऐकून तुम्हाला वाटेल आश्चर्य
Bike Tank Full : बाईक टॅंक फूल केल्यानं खरंच मिळतो का मायलेज?
Bike Tank Full : बाईकची टाकी फूल करायची की नाही यावरून सतत चर्चा सुरु असते. अनेकदा बाईक चालवणाऱ्यांना बाईकच्या परफॉर्मन्सवरून प्रश्न उपस्थित राहतात. चला तर आज आपण याविषयी जाणून घेऊया या की गाडीच्या चांगल्या परफॉर्मन्ससोबत त्याच्यासोबत पैसे कसे वाचवायचे याविषयी जाणून घेऊया.
जर तुम्ही आजवर बाईकमध्ये फक्त 100-200 रुपयांचं पेट्रोल भरत असाल, तर यापुढे चुकूनही असं करू नका. अशात आज आम्ही तुम्हाला बाईकची टाकी फूल केल्यानंतर चालवली तर त्याचे काय फायदे होतात ते सांगणार आहोत.
1. फ्युल पंपची सुरक्षा
जर बाईकची टाईक फूल भरलेली असेल तर तर फ्यूल पंप थंड राहतं आणि लुब्रिकेटेड राहतं. कमी इंधन असलं तर पंप गरम होऊ शकतं आणि त्याची लाइफ देखील कमी होऊ शकते.
2. लांब पट्ट्याचा प्रवास सोपा
लांब पट्ट्याचा प्रवास करत असाल आणि अशात तुमच्या बाईकची टाकी ही फूल असेल तर तुम्हाला सतत थांबण्याची गरज नाही. तुमचा बराच वेळ वाचेल आणि प्रवास अधिक सोयीचा होईल.
3. पैसे वाचतात?
फ्यूलचे दर वाढण्या आधी तुम्ही टाकी भरून ठेवा. त्यामुळे तुमच्या भविष्यात जर फ्युलचे दर वाढले तरी तुम्हाला त्याचा काही परिणाम होणार नाही.
4. बाईक मायलेज
जेव्हा टाकी फूल असते तेव्हा इंजिनमध्ये फ्लुलचा दबाव स्थिर राहते आणि त्यामुळे इंजिन चांगल्या प्रकारे संपूर्ण ताकदीनं काम करतं. त्याशिवाय बाईक चांगलं मायलेज देखील देऊ शकते. अर्धवट किंवा कमी भरलेली टाकी असेल तर फ्यूल पंपला सगळ्यात जास्त मेहनत करावी लागते, त्यामुळे मायलेजवर परिणाम होऊ शकतो.
5. कमी कंडेनसेशन
जर टाकी अर्धवट भरलेली असेल तर हवेच्या संपर्कात आल्यानं कंडेनसेशन (पाण्याचे ड्रॉप) तयार होण्यास मदत होते. हे पाणी फ्यूलसोबत मिळून इंजनची परफॉर्मन्सला खराब करु शकतं.
कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल?
कायम ही गोष्ट लक्षात ठेवा की नेहमीच टाकी फुल करु नका. कारण उन्हाळ्यात अनेकदा गाडी भडका घेऊ शकते. टाकीला 90-95 टक्के भरणं योग्य आहे. रेग्युलर सर्विसिंग केल्यानं बाईकचा परफॉर्मेंस आणि मायलेज टिकून राहतो. फुल टाकी केली आणि तुमच्या बाईकटी योग्य काळजी घेतली तर बराच काळ ती चांगली राहते.