ब्लॅक फ्रायडेच्या दिवशी `या` देशात झाली जबरदस्त विक्री!
अमेरिकेत ब्लॅक फ्रायडेच्या दिवशी स्मार्टफोनची जबरदस्त विक्री झाली.
सेन्ट फ्रांसिस्को : अमेरिकेत ब्लॅक फ्रायडेच्या दिवशी स्मार्टफोनची जबरदस्त विक्री झाली. ग्राहकांनी दुकानात जाऊन त्याचबरोबर ऑनलाईन खरेदी करून खरेदीचा आनंद लुटला.
खरेदीसाठी वेबसाईटचा आधार :
ब्लॅक फ्रायडे हा नोव्हेंबर महीन्याच्या चौवथ्या शुक्रवारी असतो. तेव्हापासून ख्रिसमसच्या खरेदीला सुरूवात केली जाते. एडोब इनसाइट्सच्या नुसार, स्मार्टफोन आणि टॅबलेट खरेदीसाठी सुमारे ६१.१% ग्राहकांनी वेबसाईटचा आधार घेतला.
खूप ऑफर्स ः
गार्टनरचे अनुसंधान उपाध्यक्ष एनेट जिमरमॅन यांनी सांगितले की, "इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर खूप ऑफर देण्यात आल्या होत्या. आणि त्या ऑफर अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करतील, अशी आशा आहे.
काही वर्षांपासून यूरोपमध्ये ऑनलाईन और ऑफलाईन विक्रीचे प्रमाण वाढले आहे."
या देशात खरेदीची प्रवृत्ती ः
जिमरमॅन यांनी सांगितले की, "आम्ही ब्रिटेन, जर्मनी, फ्रांस आणि इटली या देशात खरेदीची प्रवृत्ती अधिक दिसून येते. त्यामुळेच ब्लॅक फ्रायडे आणि सायबर वीक दुकानदारांसाठी चांगला ठरतो."