मुंबई : एक काळ होता, ज्यावेळी मोबाईल फोनच्या मार्केटमध्ये ब्लॅकबेरी कंपनीचा दबदबा होता. परंतू ब्लॅकबेरीचे हँडसेट यापुढे दिसणार नाही. असलेले हँडसेट काम करणार नाही. ते फक्त शो-पीस म्हणून राहतील. एकेकाळी ब्लॅकबेरी हे स्टाइल आणि लूकच्या बाबतीत लोकांचे स्टेटस सिम्बॉल होते. ब्लॅकबेरीच्या आता फक्त आठवणी राहणार आहेत. आजपासून ब्लॅकबेरी फोन सपोर्ट बंद झाला आहे. म्हणजेच आता ब्लॅकबेरीच्या कोणत्याही फोनवरून कॉल येऊ शकणार नाही, किंवा करू शकणार नाही.


सपोर्ट सिस्टीम बंद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीने 4 जानेवारी 2022 पासून आपल्या क्लासिक फोनचा सपोर्ट बंद केला आहे. याची घोषणा कंपनीने फार पूर्वीच केली होती. सपोर्ट सिस्टम क्लोजर ब्लॅकबेरीने त्याचे लोकप्रिय QWERTY की पॅड-BlackBerryOS फोन बनवणे काही वर्षांपूर्वी बंद केले.


डेटा ऍक्सेस देखील बंद


कंपनीच्या म्हणण्यानुसार, ब्लॅकबेरी 10, 7.1 ओएस किंवा त्यापूर्वीच्या सॉफ्टवेअरवर चालणारे ते सर्व ब्लॅकबेरी क्लासिक हँडसेट 4 जानेवारीपासून बंद करण्यात आले आहेत. यानंतर फोनवरून कोणताही इंटरनेट डेटा ऍक्सेस करता येणार नाही. तसेच SMS आणि आपत्कालीन सेवा देखील वापरता येणार नाहीत. 


कंपनीने सप्टेंबर 2020 मध्ये याची घोषणा केली होती. कंपनी Blackberry Limited या नावाने जगभरातील उद्योगांना आणि सरकारांना सुरक्षा सॉफ्टवेअर आणि सेवा पुरविण्यावर भर देत आहे. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे.


ब्लॅकबेरी हे स्टेटस सिम्बॉल 


ब्लॅकबेरी फोन सामान्य फोन नव्हता. मोठमोठे उद्योगपती त्याचा वापर करायचे. आजच्या काळात ज्या पद्धतीने आयफोन वापरला जातो, तीच लोकप्रियता ब्लॅकबेरीची होती. 


सिक्युरिटी आणि सेफ्टी फीचर्समुळे फोनला मोठी मागणी होती. एन्क्रिप्शन वैशिष्ट्ये हा त्याचा सर्वात महत्वाचा भाग होता, परंतु Android फोनच्या वाढत्या लोकप्रियतेमध्ये त्याची मार्केट वॅल्यू कमी होत गेली.