17.6 लाख मुंबईकरांनी झटपट मागवले कंडोम! Blinkit, Instamart, `झेप्टो` शॉपिंगची धक्कादायक आकडेवारी
Quick Commerce 2024 Shopping: भारतीयांनी ब्लिंकइट (Blinkit), झेप्टो (Zepto), स्विगी इन्स्टामार्ट (Instamart) या माध्यमातून वर्षभरात सर्वाधिक ऑर्डर केलेल्या गोष्टींची यादी पाहून व्हाल थक्क...
Quick Commerce 2024 Shopping: सध्याचा जमानाचा क्विक कॉमर्सचा आहे असं म्हटलं जातं. 2024 वर्षातील आकडेवारी पाहिलं तर असं का म्हणतात हे सहज अधोरेखित होतं. ब्लिंकइट (Blinkit), झेप्टो (Zepto), स्विगी इन्स्टामार्ट (Instamart) यासारख्या सेवांच्या माध्यमातून भारतीयांनी 'झटपट हवं आहे' म्हणत कोणकोणत्या गोष्टी मागवल्या याची आकडेवारीच समोर आली आहे. विशेष म्हणजे भारतीयांनी सर्वाधिक मागवलेल्या गोष्टींची यादी अगदीच थक्क करणारी आहे.
टूथब्रश, मॅगी अन्...
ब्लिंकइटवर भारतीयांनी 1.75 कोटी मॅगीची पाकिटं मागवली आहेत. तर झेप्टोवरुन भारतीयांनी वर्षभरात लेस मॅजिक मसाला या फ्लेव्हरच्या वेफर्सची तब्बल 12 लाख पाकिटं मागवली आङेत. त्याचप्रमाणे स्विगी इन्स्टामार्टवरुन भारतीयांनी तब्बल 2.7 लाख टूथब्रश मागवले आहेत.
अवघ्या 25 सेकंदांमध्ये ग्राहकाच्या हाती वस्तू
क्विक कॉमर्समध्ये केवळ किरणामाल नाही तर मोबाईल फोन, लॅपटॉप, औषधं आणि फॅशनेबल कपडेही मागवल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे समोर आलेल्या आकडेवारीमध्ये सर्वात वेगवान डिलेव्हरीचा विक्रमही एका कंपनीने मोडला आहे. झेप्टोने हा विक्रम आपल्या नावावर करताना अवघ्या 25 सेकंदांमध्ये मागवलेली वस्तू ग्राहकांपर्यंत पोहचवली आहे. तर इन्स्टामार्टने कोच्चीमध्ये 89 सेकंदांमध्ये डिलेव्हरी केली. ही डिलेव्हरी त्यांनी 180 मीटर अंतरावर केली.
सर्वात वेगवान डिलेव्हरी कोण करतं?
क्विक कॉमर्सच्या स्पर्धेमध्ये इन्स्टामार्ट हे डिलेव्हरीच्या टाइमचा विचार केल्यास आघाडीवर राहिल्याचं दिसून आलं. इन्स्टामार्टचा डिलेव्हरीचा सरासरी वेळ हा 8 मिनिटं इतका आहे. तर झेप्टोचा हाच वेळ 9 आणि ब्लिंकइटचा 11 मिनिटं इतका आहे. यासंदर्भातील अहवाल जेपी मॉर्गनने प्रकाशित केला आहे. आता तर झेप्टो आणि इन्स्टामार्टसारख्या कंपन्या 24x7 डिलेव्हरी करताना दिसत आहेत.
सॉफ्ट ड्रिंक्स आणि स्नॅक्स आघाडीवर
सॉफ्ट ड्रिंक्स आणि स्नॅक्स या सर्वाधिक मागवलेल्या गोष्टींपैकी आहेत. कोकाकोलाचे 1.85 कोटी कॅन्स मागवले आहेत तर 84 लाख थम्बस अपच्या बाटल्या या माध्यमातून मागवण्यात आल्या आहेत. 14.6 लाख माझाच्या बाटल्या 2024 मध्ये या क्विक कॉमर्सवरुन भारतीयांनी मागवल्या.
45 लाखांचे झाडू
या आकडेवारीमधील काही गोष्टी खरोखरच थक्क करणाऱ्या आहेत. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर दिवाळीच्या काळात लक्ष्मी म्हणून नवीन झाडू विकत घेण्याची परंपरा आहे. त्याचा परिणाम या क्विक कॉमर्समध्ये दिसून आला. दिवाळीत भारतीयांनी या तीन प्लॅटफॉर्मवरुन झाडू विकत घेण्यासाठी तब्बल 45 लाख रुपये खर्च केल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतं आहे.
बापरे! मुंबईकरांनी एवढे कंडोम मागवले
रंजक आकडेवारीबद्दल सांगायचे झालं तर मुंबईकरांनी ब्लिंकइटवरुन 17.6 लाख कंडोम वर्षभरात मागवले आहेत. बंगळुरुमध्ये झेप्टोवरुन वर्षभरात मागवलेल्या कंडोमची संख्या 4 लाख इतकी आहे. इन्स्टामार्ट वर ऑर्डर करण्यात आलेल्या 140 ऑर्डर्समागे प्रत्येक ऑर्डर ही सेक्सशीसंदर्भातील वस्तू आहे. बंगळुरुमधील लोकांनी इन्स्टामार्टवर कंडोमवर सर्वाधिक पैसा खर्च केला.