Smartwatch under 1500 Rupees: ऑनलाइन शॉपींग वेबसाईट असलेल्या अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटवर सध्या 'ब्लॉकबस्टर व्हॅल्यू डेज' (Blockbuster Value Day Amazon) हा सेल सुरु आहे. या सेलमध्ये अनेक गॅजेट्सवर दमदार सूट दिली जात आहे. ग्राहकांना ऑफर्सअंतर्गत गॅजेट्सच्या किंमतींवर मोठी सवलत देण्यात आली आहे. या सेलमध्ये प्रामुख्याने हेडफोन, इयरबड्स आणि स्मार्टवॉचचा समावेश आहे. या सेलदरम्यान एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट तसेच डेबिट कार्डवर 10 टक्कांची अतिरिक्त सूटही दिली जात आहे. त्यामुळेच हे गॅजेट्स अधिक स्वस्तात आणि कमी किंमतीत उपलब्ध आहेत. खास करुन अनेक स्मार्टवॉच या सेलमध्ये अगदी 1100 रुपयांपासून उपलब्ध आहेत. या स्मार्टवॉचसंदर्भात सविस्तरपणे जाणून घेऊयात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिजो स्मार्टवॉच - डीजो स्मार्टवॉचचं (Dizo Smartwatch) नावं डी टू पॉवर असं आहे. या घड्याळात 500 निट्सचा दमदार डिस्प्ले देण्यात आला आहे. या ब्राइट डिस्प्लेमुळे अगदी अंधारामध्येही घड्याळातील सर्व फंक्शन सहज वापरता येतील. युझर एक्सपिरियन्स अधिक चांगला करण्याच्या उद्देशाने ही खास स्क्रीन देण्यात आली आहे. या वॉचची चार्जींगची क्षमताही उत्तम आहे. एकदा चार्ज केल्यावर हे घड्याळ 10 दिवस चालतं. या सेलमध्ये घड्याळाची किंमत 1 हजार 99 रुपये इतकी आहे.


फायर बोट निनजा फिट - फायर बोट निनजा फिट (Fireboltt Ninja Fit) या स्मार्टवॉचमध्ये 1.69 इंचांची स्क्रीन देण्यात आली आहे. या घड्याळाचा डिस्प्ले अगदी घड्याळाच्या डायलवर एज टू एज पसरलेला आहे. त्यामुळे या घड्याळाला भन्नाट लूक मिळाला आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार नियमितपणे हे घड्याळ वापरल्यास 7 ते 10 दिवस घड्याळाची बॅटरी टिकते. स्टॅण्डबाय मोडवर घड्याळाची बॅटरी 40 दिवस टिकते. हे घड्याळ सेलमध्ये केवळ 1 हजार 99 रुपयांना उपलब्ध आहे. 


नॉइज ब्ल्यू टूथ स्मार्टवॉच - नॉइज ब्ल्यू टूथ स्मार्टवॉचला (Noise Bluetooth Smartwatch) 1.91 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये ट्रूसिंक्रोटीएमची सुविधा देण्यात आली आहे. या स्मार्टवॉचमध्ये कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे. या स्मार्टवॉचची सेलमधील किंमत ही 1599 रुपये इतकी आहे.


बोट वेव्ह लिप कॉल - बोट वेव्ह लिप कॉल (boat Wave Leap Call) या स्मार्टवॉचमध्ये 1.83 इंचांचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचमध्ये मल्टीपल वॉच फेस, मल्टी स्पोर्ट्स मोड, हार्ट रेट आणि ऑक्सिजन रिडींग मिटर आणि वेदर फोरकास्ट असे फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये ब्लू टूथ कॉलिंग फीचर देण्यात आलं आहे. या स्मार्टवॉचची किंमत 1599 रुपये इतकी आहे.