नवी दिल्ली: जर्मनची लक्झरी कार निर्माता बीएमडब्ल्यूने शुक्रवारी भारतातील मिनी जेसीडब्ल्यू प्रो बाजारात आणली आहे. याची शोरून किंमत ४३.९ लाख रुपये आहे या मॉडेलच्या केवळ २० कार विकल्या जाणार असल्याचे बीएमडब्ल्यूतर्फे सांगितले. यासाठी अमेझॉन इंडियावर विशेष बुकिंग करणे आवश्यक आहे.


बिना चावी चालणार बीएमडब्लू 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्गज कंपन्या आपल्या नव्या मॉडेल्समध्ये वैविध्य आणत असतात. बीएमडब्ल्यू अशी कार बनविणार आहे ज्याला चावीची गरज नसून मोबाईलमधील अॅपच्या माध्यमातून गाडी सुरू किंवा बंद होईल. बीएमडब्ल्यूच्याआधी इलेक्ट्रिक कार मेकर टेस्ला हे फिचर वापरत आहे. टेस्लाचे नवीन मॉडेल ३ एखाद्या अॅप किंवा कार्डद्वारे चालवले जाऊ शकते.


बीएमडब्ल्यूची इलेक्ट्रिक कार 


बीएमडब्लूने लवकरच पहिली वायरलेस चार्जिंगवाली इलेक्ट्रिक सेडान कार ५३० 
पहिले वायरलेस चार्जिंग इलेक्ट्रिक नवीन सेदान कार 530 e  iPhorefarmes आणत आहे. याची पूर्ण चार्जिंग होण्यासाठी साडेतीन तास लागतात. तसेच फास्ट चार्जरने चार्जिंग केल्यास फक्त अर्धा तास लागतो. बीएमडब्ल्यू कार अत्यंत महाग होणार होती पण १ जुलै रोजी जीएसटी लागू झाल्यानंतर त्यांच्या किंमतींमध्ये प्रचंड घट झाली. त्या वेळी कारची किंमत ४ लाखांनी स्वस्त झाली होती.