मुंबई : जर तुम्ही स्वतःसाठी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर काही दिवस थांबा. देशातील सुप्रसिद्ध कंपनी Bounce आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Bounce Infinity 2 डिसेंबर रोजी लॉन्च करणार आहे. तुम्ही ती फक्त 499 रुपयांमध्ये प्री-बुक करू शकता. स्कूटरचे प्री-बुकिंग लॉन्च झाल्यानंतरच सुरू होईल. ही 'मेड इन इंडिया' इलेक्ट्रिक स्कूटर असून प्रगत उपकरणांसोबतच इंटेलिजेंट फीचर्सही देण्यात आले आहेत. या स्कूटरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रायडर्सना बॅटरी रेंज आणि चार्जिंगची काळजी करण्याची गरज नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिस्चार्ज केलेली बॅटरी स्वॅप करा


स्कूटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बॅटरी आणि रेंज चार्जिंगची चिंता करावी लागू नये यासाठी कंपनी एक खास स्कीम ऑफर करणार आहे. 'बॅटरी अॅज अ सर्विस' असे या योजनेचे नाव आहे. यामध्ये ग्राहकांना स्कूटर खरेदी करताना बॅटरीसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. या पर्यायासह, बाउन्स इन्फिनिटी स्कूटर खरेदी करणारे ग्राहक बॅटरी डिस्चार्ज झाल्यावर बाउन्स बॅटरी स्वॅपिंग सेंटर्समधून चार्ज केलेल्या बॅटरीसाठी बॅटरीची देवाणघेवाण करू शकतील. यामुळे ग्राहकांना रेंज तसेच इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंगची चिंता करावी लागणार नाही.


40 ते 50 टक्के बचत


या योजनेअंतर्गत स्कूटरच्या किमतीत 40 ते 50 टक्के कपातही केली जाणार आहे. जेव्हा वापरकर्त्यांना बॅटरी स्वॅप करावी लागेल तेव्हाच त्यांना पैसे द्यावे लागतील. कमी किमतीमुळे बाऊन्स इन्फिनिटी स्कूटर अधिकाधिक लोकांना उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना बॅटरी स्वॅपिंग स्टेशन शोधण्याची चिंता करावी लागणार नाही याची खात्री करण्यासाठी कंपनी आपल्या बॅटरी स्वॅपिंग नेटवर्कचा विस्तार करत आहे. सध्या, कंपनीकडे 170 हून अधिक ठिकाणी बॅटरी स्वॅपिंग स्टेशन आहेत. येत्या काही वर्षांत यात आणखी वाढ होणार आहे. आतापर्यंत, कंपनीच्या EV श्रेणीने 20 दशलक्ष किलोमीटर व्यापले आहे आणि 5 लाखांहून अधिक बॅटरी स्वॅप यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.


बाउन्स इन्फिनिटीच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, त्याचे डिझाइन खूप मार्डन ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये राउंड हेडलॅम्प, रेट्रो-स्टाईल फ्रंट फेंडर, एलसीडी इंस्ट्रुमेंटेड कन्सोल, सिंगल पीस सीट, स्पोर्टी अलॉय व्हील, मजबूत ग्रॅब रेल आणि स्लीक टेल लॅम्प देत आहे. ही ई-स्कूटर सिंगल-टोन कलर व्हेरियंटमध्ये सादर केली जाऊ शकते. कंपनी स्कूटरमध्ये हब-माउंटेड मोटर देणार आहे. यात पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागच्या बाजूला ड्युअल सस्पेन्शन आहे. समोर आणि मागे डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.