मुंबई : टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने पुन्हा एकदा आपल्या ऑफर्स सुरू केल्या आहेत. याअंतर्गत कंपनी कमी किंमतीत गुगल स्मार्ट डिव्हाइसची ऑफर देत आहे. ही ऑफर आजपासून सुरू झाली आहे. जिथे बीएसएनएल ब्रॉडबँड ग्राहकांना गुगलचे स्मार्ट डिव्हाइस खरेदी करण्यावर काही प्रमाणात सुट मिळणार आहे. जे ग्राहक सध्या बीएसएनएलशी जोडलेले आहेत आणि ज्यांनी एफटीटीएच, एअर फायबर, डीएसएल ब्रॉडबँड सेवा घेतली आहे, ते ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही ऑफर त्या ग्राहकांसाठी आहे, ज्यांनी वार्षिक ब्रॉडबँड योजनेसाठी 799 किंवा त्याहून अधिक रुपये भरले आहेत. सवलतीच्या ऑफरअंतर्गत बीएसएनएल ब्रॉडबँड ग्राहकांना गुगल नेस्ट मिनी आणि गुगल नेस्ट हब स्मार्ट डिव्हाइसाठी ऑफर मिळणार आहे, त्याअंतर्गत ग्राहकांना दरमहा फक्त 99 रुपये आणि 199 रुपये द्यावे लागतील. हे 12 आणि 13 महिन्यांच्या सब्सक्रिप्शनसाठी वन टाईम शुल्क आहे.


सब्सक्राइबर्स या ऑफरला बीएसएनएलच्या ऑनलाइन पोर्टलद्वारे घेऊ शकतात. जे यूझर्स वार्षिक, द्विवार्षिक, त्रिवार्षिक ब्रॉडबँड योजना घेतात त्यांना 10.5 महिने, 20.5 महिन्यांसाठी वन टाईम शुल्क भरावा लागेल.


दुसरीकडे, जर कोणी तोच गूगल नेस्ट मिनी तुम्ही बाहेर विकत घेतल्यास त्यासाठी तुम्हाला 4 हजार 999 रुपये द्यावे लागतील. परंतु जर आपण बीएसएनएल भारत फायबर योजना घेतली तर आपल्याला ते 1 हजार 287 रुपयात मिळेल आणि त्याची वैधता 13 महिन्यांची असेल. जर तुम्ही ही वैध्यता 12 महिन्यांच्या योजने विकत घेतलीत तर या स्पीकरची किंमत 1 हजार 188 रुपये असेल.


आम्हाला कळू द्या की, Google नेस्ट मिनी यूझर्सना हँड्सफ्री आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही कोणतेही साँग प्ले करु शकता.


जर यूझर्सना गुगल नेस्ट हब घ्यायचा असेल, तर त्यांना दरमहा 1 हजार 999 रुपये द्यावे लागतील. याचा लाभ 10.5 महिने, 20.5 महिने आणि 30.5 महिन्यांपर्यंत मिळू शकतो. गुगल नेस्ट हबची किंमत बाजारात 9 हजार 999 रुपये आहे. परंतु बीएसएनएल ब्रॉडबँड योजनेद्वारे आपण ते 2 हजार 587 रुपयांमध्ये घेऊ शकता.