मुंबई : जिओच्या १५०० रूपयाच्या फोनच्या तोडीस तोड फोन बाजारात आणण्याचा निर्णय बीएसएनएलकडून घेतला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या फोनची किंमत मात्र अडीच हजारापेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न असेल, शिवाय भरपूर ऑफर्स देण्याचा बीएसएनएलचा प्रयत्न असणार आहे.


लाव्हा आणि मायक्रोमॅक्सची मदत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाव्हा आणि मायक्रोमॅक्सकडून या स्मार्टफोनची निर्मिती करून घेण्याचा बीएसएनएलचा मानस असणार आहे. 'कमी दरात स्मार्टफोन उपलब्ध करुन देण्यासाठी बीएसएनएलने मायक्रोमॅक्स आणि लाव्हा कंपनीसोबत भागिदारी केली आहे. मात्र या स्मार्टफोनची नक्की किंमत किती असेल, याबाबत सध्या विचार सुरु आहे, बीएसएनएलचे अधिकारी के. रामाचंद यांनी ही माहिती दिली आहे. 


ग्रामीण भागात बीएसएनएलचा दबदबा


सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, १८ टक्क्यांपर्यंत इंटरनेट ग्रामीण भागात वापरला जातो ग्रामीण भागात बीएसएनएलचे ग्राहक चांगल्या प्रमाणात असल्याने बीएसएनएलने स्मार्टफोनबाबतही विचार सुरु केला आहे. हा रिपोर्ट पाहून बीएसएनएलने स्मार्टफोनबाबतची घोषणा केली आहे.


बीएसएनएलसोबत करारकरून जिओची वाढ


मात्र दुसरीकडे ज्या ठिकाणी जिओची पोहोच कमी होती, त्या ठिकाणी आता बीएसएनएल कार्यालयांमधील, टेलिफोन एक्स्चेंजमधील बीएसएनएल टॉवर आता जिओने शेअर केल्याने जिओची देखील पोहोच ग्रामीण भागात वाढली आहे.