खूशखबर! बीएसएनएलने लॉन्च केला ४९९ रुपयांचा स्वस्त फोन
बीएसएनएलने फक्त 499 रुपयांमध्ये मोबाईल फोन लॉन्च केला आहे. डिटेल डी1 असं या फोनचं नाव आहे. बीएसएनएलने मोबाईल बनवणारी कंपनी डीटेलसोबत करार केला आहे.
मुंबई : बीएसएनएलने फक्त 499 रुपयांमध्ये मोबाईल फोन लॉन्च केला आहे. डिटेल डी1 असं या फोनचं नाव आहे. बीएसएनएलने मोबाईल बनवणारी कंपनी डीटेलसोबत करार केला आहे.
कंपनीचा दावा आहे की, डीटेल डी1 हा खूपच स्वस्त फीचर फोन आहे. या फोनवर पहिल्या रिचार्जची वैधता 365 दिवस असेल. युजर्सला 103 रुपयांचा टॉक टाइम देखील मिळेल. BSNL ते BSNL 15 पैसे प्रति मिनिट तर दुसऱ्या नेटवर्कवर 40 पैसे प्रति मिनिट कॉल रेट असतील.
या फीचर फोनमध्ये 1.44 इंचचा मोनोक्रोम डिस्प्ले देण्यात आला आहे. फिजिकल कीपॅडसोबत हा सिंगल सिम फोन आहे. याची बॅटरी 650mAh ची आहे. यामध्ये टॉर्च लाइट, फोनबुक आणि एफएम रेडियो सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
बीएसएनएलचे प्रवक्ता यांनी म्हटलं की, 'आम्ही आमच्या ग्राहकांना स्वस्त आणि चांगली सेवा देण्यासाठई कटीबद्ध आहोत. आमचा उद्देश देशाला मजबूत करणे आहे. यामुळे या करारासोबत मोबाईल फोन खरेदी करणाऱ्याची त्या व्यक्तीची इच्छा आम्ही पूर्ण करणार आहोत.
बीएसएनएलने मायक्रोमॅक्स सोबत देखील करार करत 'भारत 1' 4G फीचर फोन लॉन्च केला होता. या फोनची किंमत 2,200 रुपये होती. हा फोन 22 भारतीय भाषांना सपॉर्ट करतो. भारत 1 मध्ये एक 2.4 इंचचा QVGA डिस्प्ले देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 205 प्रोसेसर देण्यात आला आहे. 512MB रॅम आणि 4GB इंटरनल स्टोरेज आहे. 2000mAh बॅटरी या फोनमध्ये देण्यात आली आहे. या 4G VoLTE फोनमध्ये 2MP प्रायमरी आणि VGA सेल्फी कॅमरा देण्यात आला आहे.