BSNL ची धमाकेदार ऑफर, नव्या प्लानमध्ये मिळणार 45 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
टेलिकॉम ऑपरेटर कंपनी बीएसएनएलने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी नवे प्लान्स लॉन्च करत आहे. आता पुन्हा एकदा कंपनीने जिओवर मात करण्यासाठी नवा पोस्टपेड प्लान लॉन्च केला आहे.
नवी दिल्ली : टेलिकॉम ऑपरेटर कंपनी बीएसएनएलने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी नवे प्लान्स लॉन्च करत आहे. आता पुन्हा एकदा कंपनीने जिओवर मात करण्यासाठी नवा पोस्टपेड प्लान लॉन्च केला आहे.
आता बीएसएनएल कंपनीने एक जबरदस्त पोस्टपेड प्लान ग्राहकांसाठी लॉन्च केला आहे. यामध्ये ग्राहकांना प्रत्येक महिन्याला अनलिमिटेड वॉईस कॉलिंग सोबतच 45 GB डेटा फ्री मिळणार आहे. यासोबतच ग्राहकांना इतरही लाभ मिळणार आहेत.
असा आहे बीएसएनएलचा नवा प्लान
बीएसएनएलच्या या प्लानची किंमत 499 रुपये आहे. या प्लान अंतर्गत ग्राहकांना प्रति महिना अनलिमिटेड वॉईस कॉल्स आणि 45 GB इंटरनेट डेटा मिळणार आहे. यामध्ये रोमिंग दरम्यान सुद्धा फ्री कॉलिंगची सुविधा देण्यात येत आहे. हा प्लान केवळ पोस्टपेड ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
जिओच्या प्लानला टक्कर
बीएसएनएलचा हा प्लान जिओच्या 509 रुपयांच्या प्लानला टक्कर देणार आहे. जिओच्या 509 रुपयांच्या पोस्टपेड प्लान अंतर्गत ग्राहकांना एकूण 60 GB डेटा मिळणार आहे. इंटरनेट डेटा वापरण्याची सीमा 2GB प्रति दिवस अशी आहे.
प्रीपेड ग्राहकांनाही मिळणार फायदा
बीएसएनएलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठीही प्लान लॉन्च केला आहे. हा प्लान जिओला टक्कर देण्यासाठी लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना अवघ्या 7 रुपयांत 1GB इंटरनेट डेटा उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या पॅकची व्हॅलिडिटी एका दिवसाची असणार आहे. म्हणजेच संपूर्ण डेटा वापरण्यासाठी युजर्सकडे एका दिवसाचा कालावधी असणार आहे.
जिओपेक्षा चांगला प्लान केला लॉन्च
बीएसएनएलने जिओच्या 19 रुपयांच्या प्लानला टक्कर दिली आहे. जिओच्या 19 रुपयांच्या प्लान अंतर्गत युजर्सला केवळ 0.15 GB इंटरनेट डेटा मिळतो. या प्लानची वैधता केवळ एका दिवसाची आहे. या पॅकमध्ये ग्राहकांना जिओ टीव्ही आणि सिनेमा सारख्या सेवांचा लाभही मिळतो.