नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ने शुक्रवारी आपल्या ग्राहकांसाठी एक नवा कॉम्बो प्लान लॉन्च केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च झालेल्या बीएसएनएलच्या या कॉम्बो प्लानची किंमत ७४ रुपये आहे. कॉम्बो प्लान असल्याने युजर्सला या प्लानमध्ये इंटरनेट डेटा, कॉलिंग सुविधा आणि एसएमएस मिळणार आहेत.


७४ रुपयांत मिळणार सर्वकाही


बीएसएनएल पुर्वापासूनच ठराविक सण, उत्सव किंवा नव्या वर्षाला स्पेशल टेरिफ प्लान लॉन्च करत असतं. यंदा बीएसएनएलने ७४ रुपयांचा टेरिफ प्लान लॉन्च केला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज १जीबी इंटरनेट डेटा, १०० एसएमएस आणि कॉल्स करण्यासाठी १० रुपयांचा टॉक व्हॅल्यू मिळणार आहे.


युजर्स होऊ शकतात नाराज


बीएसएनएलच्या या प्लानमुळे युजर्स काही प्रमाणात नाराज होऊ शकतात. कारण, यामध्ये फ्री कॉलिंगची सुविधा नाहीये. तसेच या प्लानची वैधता केवळ ३ दिवसच आहे. 


यासाठी केला हा प्लान लॉन्च


बीएसएनएलसोबतच इतरही टेलिकॉम कंपन्या १ जानेवारी, होळी, दिवाळी सारख्या दिवशी आपली फ्री सेवा बंद करते. या दिवशी ग्राहकांना कॉलिंग किंवा एसएमएस सारख्या सेवांपासून दूर रहावं लागतं. मात्र, आता बीएसएनएलने लॉन्च केलेल्या या टेरिफ प्लानच्या माध्यमातून युजर्स एक जानेवारीलाही इंटरनेट डेटा आणि एसएमएसची सुविधा मिळणार आहे.


जिओच्या ९८ रुपयांच्या प्लानसोबत टक्कर


बीएसएनएलच्या या प्लानचा मुकाबला रिलायन्स जिओच्या ९८ रुपयांच्या प्लानसोबत असणार आहे. जिओ आपल्या युजर्सला दररोज १५० एमबी डेटा, अनलिमिटेड फ्री कॉलिंगसोबतच प्रतिदिन १४० एसएमएसची सुविधा देत आहे. तसेच जिओच्या या प्लानची वैधता १४ दिवसांची आहे.