रिलायन्स जिओपेक्षा धमाकेदार बीएसएनएलचा `हा` खास प्लॅन
रिलायंस जियोच्या प्लॅनने टेलिकॉम क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातल्यानंतर सार्याच कंपन्यांनी आता धमाकेदार ऑफरची सुरूवात केली आहे.
मुंबई : रिलायंस जियोच्या प्लॅनने टेलिकॉम क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातल्यानंतर सार्याच कंपन्यांनी आता धमाकेदार ऑफरची सुरूवात केली आहे.
प्रत्येक कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवे प्लॅन बनवते. मागील दोन आठवड्यापासून या प्लॅन्समध्ये अनेक मोठे बदल होत आहेत.
एअरटेल, आयाडिया पाठोपाठ आता बीएसएनएलनेदेखील त्यांच्या १८७ रूपयांच्या प्लॅनमध्ये बदल करून नवी ऑफर आणली आहे.
आयडीया आणि एअरटेलमध्ये टक्कर
ऑक्टोबर महिन्यामध्ये बीएसएनएलने १८७ रूपयांचा खास प्लॅनआणला होता. या प्लॅननुसार, होम सर्कलमध्ये अनलिमिडेट कॉलिंगची सोय आणि सोबतच १ जीबी डाटा मिळतो. त्यावेळेस या प्लॅनला 28 दिवसांसाठी व्हेलिडीटी होती. बीएसएनएलच्या या प्लॅनला एअरटेलच्या १९९ तसेच आयडियाचा प्लॅन १९७ रूपयांचा प्लॅनची टक्कर आहे.
दुसर्या सर्कलमध्ये फ्री कॉलिंग
बीएसएनएलच्या प्लॅनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. आता यामध्ये अनेक आकर्षक प्लॅनचा समावेश करण्यात आला आहे.
अनलिमेडेट नॅशनल रोमिंग वॉईस कॉल सोबतच इतर सर्कलमध्ये कॉल केल्यास तो देखिल मोफत मिळणार आहे. आता बीएसएनएलच्या कोणत्याही सर्कलमध्ये कॉल करण्याची संधी मिळेल.
नवा प्लॅन
बदलानंतर आता बीएसएनएलच्या १८७ च्या प्लॅननुसार आऊटगोईंग रोमिंग कॉलसोबत अनलिमिडेट वॉईस कॉल मिळेल. १ जिबी डाटा आणि फ्री कॉल ट्युन मिळेल.
व्हॅलिडीटीदेखील २८ दिवसांची असेल.