नवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपली सेवा सुरु केल्यानंतर इतरही टेलिकॉम कंपन्यांचे धाबे चांगलेच दणाणले. त्यानंतर सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी नव्या ऑफर्स सादर करण्यास सुरुवात केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांत रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोनने आपल्या ग्राहकांसाठी चांगल्या ऑफर्स उपलब्ध करुन दिल्या. त्यानंतर आता भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने एक जबरदस्त ऑफर आणली आले.


बीएसएनएलची ऑफर ऐकल्यानंतर तुम्हीही म्हणाल ही एकदम जबरदस्त ऑफर आहे. कंपनीने ही ऑफर आपल्या ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी सुरु केली आहे.


BSNL नव्या ऑफर अंतर्गत ७ रुपयांच्या रिचार्जवर ६० रुपयांचा टॉकटाईम देत आहे. यासोबतच कंपनीकडून ५०० mb इंटरनेट डेटाही मोफत दिला जात आहे. तसेच हा प्लान तुम्ही तब्बल २८ दिवसांपर्यंत वापरू शकता.


आपल्या ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी प्रत्येक टेलिकॉम कंपनी कुठली ना कुठली ऑफर घेऊन येत असते. बीएसएनएलने हा प्लान रिलायन्स कम्यूनिकेशन आणि टाटा डोकोमोच्या युजर्सला लक्षात घेऊन सादर केला आहे.


जर तुमच्याकडे बीएसएनएलचं सिमकार्ड नाहीये तर तुम्ही तुमचा नंबर बीएसएनएलमध्ये पोर्ट करुन या प्लानचा लाभ घेऊ शकता. पण, एकदा तुम्ही नंबर पोर्ट केला तर ९० दिवसांपर्यंत तुम्ही इतर कंपनीची सेवा घेऊ शकत नाही म्हणजेच तुम्ही इतर टेलिकॉम कंपन्यांत पोर्ट करु शकत नाही.