नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आपला जबरदस्त प्लान लॉन्च केला आहे. बीएसएनएलने आपल्या युजर्ससाठी तब्बल 1500 GB डेटा उपलब्ध करुन देण्याचा प्लान लॉन्च केला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना 100 mbps चा स्पीड मिळणार आहे.


केवळ इंटरनेटच नाही तर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

BSNL चा हा प्लान ब्रॉडबँड युजर्ससाठी असणार आहे. चेन्नई सर्कलमध्ये या प्लानची किंमत 4,999 रुपये असणार आहे. तसेच दररोजची डेटा मर्यादा संपल्यानंतर युजर्सला 2 mbps च्या स्पीडने इंटरनेट डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये BSNL केवळ डेटाच नाही तर इतर कंपन्याप्रमाणे कुठल्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगची सुविधा देणार आहे.


BSNLचे इतर प्लान्स


BSNL च्या या प्लानसोबतच इतरही ब्रॉडबँड प्लान्स उपलब्ध आहेत. कंपनीच्या इतर प्लान्समध्ये 999 रुपयांपासून 2999 रुपयांपर्यंतचे प्लान्स आहेत. 999 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना 250 GB डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना 60 mbps चा स्पीडही मिळणार आहे. हा प्लान चेन्नई सर्कलसाठी असणार आहे.


तसेच, BSNL 1299 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना 400 GB डेटा उपलब्ध करुन देत आहे. तर, 1699 रुपयांच्या प्लानमध्ये 559 GB डेटा मिळणार आहे. 1999 रुपयांच्या प्लानमध्ये 800 GB डेटा आणि 2999 रुपयांच्या प्लानमध्ये 900 GB डेटा मिळत आहे. यासोबतच दररोजची इंटरनेट डेटा मर्यादा संपली तर ग्राहक 2 mbps या स्पीडने इंटरनेट वापरु शकणार आहेत.