BSNL चा धमाकेदार प्लान, 99 रुपयांत मिळणार 20Mbps स्पीड
पाहा काय आहे हा प्लान
नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी BSNLने आपल्या ग्राहकांसाठी चार नवे ब्रॉडबँड प्लान्स लॉन्च केले आहेत. यामध्ये 20 Mbps चा स्पीड ग्राहकांना मिळणार आहे. एका रिपोर्टनुसार, हे प्लान्स प्रमोशनल म्हणून लॉन्च केले आहेत आणि केवळ नव्या युजर्ससाठी हे प्लान्स वैध असणार आहेत. या नॉन -FTTH BSNL प्लान्सची किंमत 99 रुपयांपासून ते 399 रुपयांपर्यंत आहे. यामध्ये ग्राहकांना प्रति महिना 45GB रुपयांपासून प्रति महिना 600 GB पर्यंत डेटा ग्राहकांना मिळणार आहे.
टेलिकॉमटॉक ने दिलेल्या वृत्तानुसार, या प्लान्समध्ये ठराविक सिमेपर्यंत युजर्सला 20Mbps चा स्पीड मिळणार आहे आणि याची वैधता संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 1Mbps होईल. या प्लान्समध्ये युजर्सला कुठल्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आणि डेटा मिळणार आहे. तसेच अंदमान आणि निकोबार वगळता देशातील इतर सर्व ग्राहकांसाठी हे प्लान्स असणार आहेत.
BSNL BBG कॉम्बो ULD 45GB प्लानची किंमत 99 रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये 1.5GB डेटा मिळणार आहे. त्याचप्रमाणे 150GB च्या प्लानची किंमत 199 रुपये असून यामध्ये ग्राहकांना प्रति दिन 5Gb डेटा मिळणार आहे. 300GB आणि 600GB डेटा प्लानची किंमत क्रमश: 299 रुपये आणि 399 रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये दररोज 10GB आणि 20GB डेटा ग्राहकांना मिळणार आहे.
या प्लानमध्ये 20Mbps चा स्पीड ग्राहकांना ठराविक मर्यादेपर्यंत दिला जाणार आहे. त्यानंतर हा स्पीड 1Mbps होईल. मिळालेल्या माहितीनुसार, स्पीड मिडनाईट 12am ला रिस्टोअर केला जाईल. ही एक प्रमोशनल ऑफर आहे त्यामुळे केवळ 90 दिवसांसाठीच वैध राहाणार आहे. सहा महिन्यांपर्यंत या प्लान्सचा लाभ घेतल्यानंतर ग्राहक BSNL चे इतर प्लान्स घेऊ शकतात. तसेच रिपोर्ट्सनुसार, नव्या ग्राहकांना 500 रुपये डिपॉझिट करावे लागणार आहेत.