मुंबई : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेड आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी धमाकेदार ऑफर (BSNL Promotional Offer) घेऊन आली आहे. कंपनीने आपल्या सर्वात पॉपुलर प्लानमध्ये (Mithram Plus Plan) एक जबरदस्त प्रमोशनल ऑफर सुरु केली आहे. आता या प्लॅानमध्ये आपण सर्व काही दुप्पट मिळणार आहे. वैधतेसह इंटरनेट डेटाही दुप्पट मिळणार आहे. (BSNL Promotional Offer Mithram Plus Plan) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीएसएनएल सर्वाध प्रसिद्ध रिचार्ज व्हावचरमध्ये बदल केला आहे.  टेलिकॉम कंपनीने आता Mithram Plus Planची ऑफर आणली आहे. टेक साईटच्या माहितीनुसार आता बीएसएनएल 109 रुपयांच्या रिचार्ज कूपनमध्ये सगळ्या सुविधा आता दुप्पट मिळणार आहेत.


व्हॅलिडिटी 30 ऐवजी 75 दिवसांची


बीएसएनएलने 109 रुपयांच्या रिचार्ज कुपनवर मिळणारी 30 दिवसांची वैधता आता 75 दिवसांची केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता 45 दिवसांची जास्तीची मुदत मिळणार आहे.


5 जीबीऐवजी 10 जीबी डेटा


ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीनेने 109 रुपयांच्या रिचार्ज  कूपनमध्ये इंटरनेट डेटा जास्त देणार आहे. आधी या कुपनमध्ये फक्त 5 जीबी डेटा दिला जात होता. आता Mithram Plus Plan ग्राहकांना10 जीबी डेटा मिळणार आहे.


अनलिमिटेड कॉलिंग 


बीएसएनएलने अनलिमिटेड कॉलिंगची (Unlimited Calling)  सुविधा कोणत्याही नेटवर्कमध्ये मिळणार आहे. प्रमोशनल ऑफरची वैधता 20 दिवसांची असणार आहे. बीएसएनएल स्पष्ट केले आहे 5 जीबीऐवजी 10 जीबी प्रमोशनल ऑफरची वैधता 20 दिवसांची आहे.


1 एप्रिलपासून Mithram Plus Plan ही सेवा बंद होणार आहे.रिपोर्टनुसार सर्वात पॉपुलर प्लान यावर्षी 1 एप्रिलपासून बंद होऊ शकतो.