मुंबई : खासगी कंपन्यांनी टॅरिफमध्ये वाढ केल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे. कारण गेल्या दोन वर्षांत दुसऱ्यांदा कंपन्यांनी दरात मोठी वाढ केली. त्याच वेळी, काही टॅरिफ योजनांमध्ये बदल केले आहेत. योजनांमध्ये बदल करताना फायदे कमी होत गेले परंतू किंमत वाढत गेली. यामध्ये फक्त बदलली नाही ती गोष्ट म्हणजे वैधता!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

400 रुपयांचा प्लॅन आता दोन वर्षात 600 रुपयांचा झाला असला तरी अजूनही केवळ 28 दिवस ही वैधता कायम आहे. परंतू सरकारी मालकीची कंपनी BSNL वापरकर्त्यांना 28 दिवसच नव्हे तर काही प्लॅनमध्ये 90 दिवसांची अतिरिक्त वैधता देत आहे.


BSNL ने आपल्या वापरकर्त्यांसाठी काही प्लॅन आणले होते, ज्यामध्ये 60 दिवसांची अतिरिक्त वैधता दिली जात होती, तर काही दिवसांसाठी, कंपनी स्वतः या प्लॅनमध्ये 90 दिवसांची अतिरिक्त वैधता देत आहे. 


नवीन वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी, BSNL ने रु. 2,399 चा प्लान सादर केला जो एक वार्षिक प्लान होता. या प्लॅनची ​​वैधता 365 दिवस असली तरी, ऑफर अंतर्गत यूजर्सना अतिरिक्त 90 दिवस  अतिरिक्त दिली जात आहे.  356 ऐवजी यूजर्सना 455 दिवसांची वैधता मिळत आहे. 


ही योजना 15 जानेवारी रोजी संपणार होती, परंतु कंपनीने अद्याप ती सुरू ठेवली आहे. एकीकडे खासगी कंपन्या महिनाही पूर्ण भरू देत नाही, तर दुसरीकडे सरकारी कंपनीकडून 90 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळते.


इतकेच नाही तर मासिक किंवा त्रैमासिक प्लॅन पाहिला तर तिथेही बीएसएनएल खाजगी ऑपरेटर्सपेक्षा कमी शुल्क आकारत आहे. त्रैमासिक प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, Jio चा प्लॅनची किंमत 666 रुपये आहे आणि त्यात दररोज 1.5 GB डेटा दिला जात आहे. 


त्याच वेळी, Airtel आणि VI या प्लॅनसाठी 719 रुपये आकारत आहेत. या कंपन्याही दररोज 1.5 जीबी डेटा देत आहेत. या कंपन्यांच्या प्लॅनची ​​वैधता 84 दिवसांची आहे आणि यादरम्यान अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत.


परंतू बीएसएनएलने 485 रुपयांचा तिमाही प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस देखील दररोज उपलब्ध आहेत. हा प्लॅन 90 दिवसांसाठी आहे. 


म्हणजेच तुम्हाला खाजगी कंपन्यांपेक्षा 6 दिवस जास्त मिळतात. हे 6 दिवस म्हणजे 6 दिवस अतिरिक्त अमर्यादित कॉलिंग, 600 SMS आणि 9 GB अतिरिक्त डेटा होय. तुम्ही खाजगी कंपन्यांकडून फक्त 9 GB वेगळा डेटा रिचार्ज केल्यास सुमारे 100 रुपये शुल्क भरावे लागेल.


दोन दिवस कमी देऊन कंपन्या कमावतात नफा
या कंपन्या एका महिन्यात फक्त 2 दिवस वाचवून मोठी कमाई करतात. हे फक्त दोन दिवस वाटत असले तरी वापरकर्त्यांकडून पूर्ण महिन्याचा एक्स्ट्रा रिचार्ज घेतला जातो आणि या अतिरिक्त रिचार्जमधून खासगी कंपन्या कोट्यवधींची कमाई करतात.
 
30 दिवस वैधतेची मागणी
जेव्हापासून खाजगी कंपन्यांनी त्यांचे दर वाढवले ​​आहेत, तेव्हापासून वापरकर्ते 30 दिवसांच्या वैधतेची मागणी देखील तीव्र करत आहेत. याबाबत सोशल मीडियावरही अनेक पोस्ट टाकल्या जात असून खासगी कंपन्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. .


बीएसएनएलकडे ग्राहकांचा कल
गेल्या काही महिन्यात खासगी कंपन्यांचे ग्राहक त्यांचे नंबर BSNL वर पोर्ट करत आहेत आणि बरेच नवीन सिम देखील खरेदी केले जात आहेत. अशा परिस्थितीत, खासगी कंपन्या यातून काही धडे घेतील आणि त्यांचा टॅरिफ प्लॅन किंवा वैधता सुधारतील अशी ग्राहकांना अपेक्षा आहे.