मुंबई : आपण कार खरेदी करण्याचा विचार करीत आहात, पण बजेट खूप कमी आहे. तर आपली गरजेनुसार आणि  बजेटनुसार या कार घेऊ शकता. आपल्याला कमी पैशात चांगली कार घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या कारची किंमत तीन लाख रुपयांपेक्षा कमी आहेत. या कारचा लूक आणि मायलेज तसेच कामगिरी यात मागे नाहीत. 


मारुती अल्टो (Maruti Alto)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परवडणार्‍या कारच्या यादीत मारुतीची अल्टो (Maruti Alto) पहिला क्रमांक लागतो. तीन लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत मारुती अल्टोची सुरुवात होते. दिल्लीतील एक्स शोरुममध्ये २.९४ लाख रुपयांपासून सुरुवात होते. ही कार  २२.०५ किलोमीटर प्रती लिटर मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे . ही कार पेट्रोल आणि सीएनजी दोन्हीमध्ये उपलब्ध आहे. तीसीएनजी वर ३१.५९ किमी प्रति लीटर मायलेज देते. यात मारुती अल्टो सहारंगात उपलब्ध आहे, पॉवर स्टीयरिंग, अँटी-लॉक ब्रेक सिस्टम, ड्रायव्हर एअरबॅग, पॅसेंजर एअरबॅग फ्रंट पॉवर विंडो फीचर्स उपलब्ध आहेत.



रेनॉल्ट क्विड (Renault KWID)


रेनो क्विड ही कार तीन लाखाहूनही कमी किंमतीत उपलब्ध आहे. दिल्लीत त्याची एक्स शोरूम किंमत २.९४ लाख रुपये आहे. या कारचे मायलेज मारुती अल्टोपेक्षा अधिक आहे, कंपनीने दावा केला आहे की ही कार एका लिटरमध्ये २५.७ किमी चालवू शकते. कारमध्ये ड्रायव्हर एअरबॅग, अँटी-लॉक ब्रेक सिस्टम मिळते. याशिवाय सीटबेल्ट स्मरणपत्र, स्पीड अलर्ट सिस्टम आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आदी सुविधा उपलब्ध आहेत.



डॅटसन रेडी-गो (Datsun redi-GO)


कमी बजेटमध्ये डॅटसन रेडी-गो ((Datsun redi-GO)देखील एक चांगला पर्याय आहे. दिल्लीत त्याची एक्स-शोरूम किंमत २.८६ लाखांपासून सुरू होते. यात ०.८ लिटर पेट्रोल इंजिन आहे. कंपनीने मायलेज २२.७ किलोमीटर प्रतिलिटर असल्याचा दावा केला आहे. डॅटसन रेडी-गोच्या सर्व प्रकारांमध्ये ईबीडी, ड्रायव्हर साइड एअरबॅग, स्पीड चेतावणी प्रणाली, मागील पार्किंग सेन्सर्स आणि सीट बेल्ट आदी सुविधा उपलब्ध आहेत.