ATM News : कोरोना संकटाना (Corona Crises) खासगी क्षेत्रात नोकरी किती काळ टिकून राहील याबात सांगता येणार नाही. कारण अनेकांना या संकटात नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यामुळे आपला स्वत:चा चांगला व्यवसाय (Business Idea) असावा ही प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र बिझनेस म्हटलं की त्याला लागणारी गुंतवणूक आड येते. जर तुम्ही काही व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर कमी पैशाची गुंतवणूक करुन सुरू करता येऊ शकतो अशा बिझनेसची आज माहिती देत आहोत. SBI आणि अनेक खाजगी बँका तुम्हाला ही संधी देऊ शकतात. जर तुमच्याकडे स्वतःची जमीन असेल तर तुम्ही एटीएम मशीन (ATM Machine) बसवून दर महिन्याला मोठी कमाई करू शकता. मात्र यासाठी तुम्हाला काही आवश्यक अटी पूर्ण कराव्या लागतील. त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने टाटा इंडिकॅश, मुथूट एटीएम आणि इंडिया वन एटीएम सोबत भारतात एटीएम सुरू करण्यासाठी करार केला आहे. तुम्हालाही SBI ATM फ्रँचायझीसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला फक्त कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन करायचे आहे. तुम्ही इतर कोणत्याही ठिकाणाहून अर्ज केल्यास तुम्ही फसवणुकीलाही बळी पडू शकता, कारण फसवणूक करणारे एटीएम फ्रँचायझीच्या (ATM Franchise) नावाखाली तुमची दिशाभूल करू शकतात.


वाचा : आज तर 'या' बँका बंदच; पण जाणून घ्या नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँकांना कुलूप


प्रक्रिया म्हणजे काय?


एटीएम (ATM) बसवण्यासाठी तुम्हाला प्रथम बँकेच्या (Bank) शाखेत जावे लागेल आणि तेथे जाऊन संपूर्ण माहिती घ्यावी लागेल.जर तुम्ही त्या अटींची पूर्तता करत नसाल किंवा त्यांची पूर्तता करू शकत नसाल तर तुम्हाला एटीएम बसवता येणार नाही. अटी पूर्ण केल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता. तुमच्या अर्जानंतर, बँक पडताळणी करते. सत्यापन प्रक्रिया पूर्ण होताच तुमच्या जागेवर एटीएम स्थापित केले जाईल.


काय गरजेचे असेल?


एटीएमसाठी (ATM) तुमचे क्षेत्रफळ 50 ते 80 स्क्वेअर फूट असावे. जागा निवासी नसून व्यावसायिक असणे गरजेचे आहे. याशिवाय, लोकांना सहज उपलब्ध होईल असे ठिकाण असावे आणि विजेची सतत उपलब्धता असावी. ज्यासाठी किमान 1kW वीज जोडणी आवश्यक असते. काँक्रीट आणि विटांनी बनलेली कायमस्वरूपी खोली देखील असावी. हे एटीएम कोणत्याही सोसायटीत बसवायचे असतील तर व्ही-सॅट (V-SAT) सुरू करण्यासाठी सोसायटी किंवा अधिकाऱ्यांकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल.