iphone 13 घ्यायचा असेल तर मिळू शकतं 46,000 रूपयापर्यंतचा डिस्काउंट
एक्सचेंस ऑफर्स चा वापर करून तुम्ही आयफोन 13 सीरिजवर डिस्काउंट घेऊ शकता. त्यासाठी तुम्हांला तुमचा जुना फोन जसा आयफोन 12 सीरिजमधला किंवा Samsung Galaxy S20 एक्सचेंस करावा लागेल.
मुंबई: iPhone 13 मागच्याचं आठवड्यात लॉन्च झाला. या सीरिजमध्ये आयफोन 13, आयफोन 13 मिनी, आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्स कंपनीने लॉन्च केले होते. तुम्हांला जर अॅपलचा हा नवीन आयफोन विकत घ्याचा असेल तर अॅपल यावर डिस्काउंट देत आहे. एक्सचेंस ऑफर्स चा वापर करून तुम्ही आयफोन 13 सीरिजवर डिस्काउंट घेऊ शकता. त्यासाठी तुम्हांला तुमचा जुना फोन जसा आयफोन 12 सीरिजमधला किंवा Samsung Galaxy S20 एक्सचेंस करावा लागेल.
अॅपल कंपनीच्या लिस्टनुसार तुम्ही आयफोन 8 च्या सीरिजच्या वरचा आयफोन देऊ शकता. तुमच्याकडे अॅपलचा आयफोन नसेल तरीसुद्धा तुम्ही Samsung किंवा OnePlus च्या सीरिजमधला फोन देऊन घेऊ शकता. पण त्याची तुम्हांला आयफोनपेक्षा कमी किंमत मिळेल.
असा करा तुमचा जुना फोन एक्सचेंस
फोन एक्सचेंस करण्यासाठी तुम्हांला अॅपलच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. त्यानंतर आयफोन 13चं प्री-ऑर्डर पेज ओपन करावं लागेल. पेजवर तुम्हांला Trade-in चं ऑप्शन दिसेल. त्यांवर क्लिक करून पिन कोड टाकावा लागेल. त्यासोबतचं तुमच्या जुन्या फोनची माहिती द्यावी लागेल, नंतर लगेचचं त्याची किंमत कळेल. मग तुम्ही आयफोन 13 सीरिजमधला कोणताही फोन डिस्काउंटवर घेऊ शकता.
बेस आयफोन 13 128GB ची किंमत भारतात 79,900 रुपये आहे. तर भारतात आयफोन 13 च्या 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 89,900 रुपये आहे. आयफोन 13 च्या 512GB व्हेरिएंटची किंमत 1,09,900 रुपये आहे. भारतात आयफोन 13 प्रो मॅक्सची किंमत 128 जीबीच्या बेस स्टोरेज पर्यायासाठी 1,29,900 रुपयांपासून सुरू होत आहे. आयफोन 13 प्रो मॅक्सच्या 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेज पर्यायांची किंमत 1,39,900, 1,59,900 आणि 1,79,900 रुपये आहे. भारतात आयफोन 13 मिनी 128GB च्या बेस स्टोअर पर्यायाची किंमत 69,900 रुपयांपासून सुरु होत आहे.