जयपूर : रिलायन्स जिओनं भारतीय टेलिकॉम क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातला आहे. २०१७ साली कंपनीनं जिओचा फिचर फोन लॉन्च केला होता. यानंतर आता जिओ त्यांचा फिचर फोन फक्त ९५ रुपयांमध्ये ग्राहकांना देणार आहे. राजस्थान सरकार आणि रिलायन्स जिओनं पार्टनरशीप करून ही ऑफर आणली आहे. या फोनमध्ये ६ महिन्यांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा मिळणार आहे. हा प्लान भामाशाह ऑफर अंतर्गत देण्यात येत आहे. राजस्थान सरकारच्या भामाशाह योजनेचं कार्ड नंबर असणाऱ्यांनाच या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भामाशाह नंबर असणारे ग्राहक जिओ फोनच्या रिटेल स्टोअरवर जाऊन या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या ऑफरसाठी ग्राहकांना १,०९५ रुपये भरावे लागणार आहेत. यानंतर रिटेलर ग्राहकांकडून भामाशाह नंबर घेईल. मग तुमच्या आधार नंबरवरून सीमकार्ड अॅक्टिव्हेट करण्यात येईल.


राजस्थान सरकार ग्राहकाच्या खात्यामध्ये ५०० रुपये जमा करणार आहे. यानंतर उरलेले ५०० रुपये घेण्यासाठी ग्राहकाला जिओ फोनवर भामाशाह अॅप डाऊनलोड करावं लागेल आणि सर्व्हिस अॅक्टीव्हेट करावी लागेल. यानंतर भामाशाह नंबर ऑथेन्टिकेट करून ग्राहकांच्या मोबाईल वॉलेटमध्ये ५०० रुपये जमा होतील. ही स्कीम फर्स्ट जनरेशन जिओ फोनसाठी आहे.