Flipkart Pay Later Option: तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाईन शॉपिंग म्हटलं की जीव की प्राण असतो. भारतात ऑनलाइन शॉपिंगसाठी प्रमुख प्लॅटफॉर्म किंवा ई-कॉमर्स वेबसाइट्स म्हणजे Amazon आणि Flipkart. या प्लॅटफॉर्मवरून नुसत्या एका क्लिकवर आवडलेल्या वस्तूंची खरेदी करता येते आणि घरपोचदेखील मिळतात. त्यामुळे गेल्या काही दिवसात ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ वाढली आहे. जर तुम्हाला ऑनलाइन शॉपिंगची आवड असेल तर तुमच्यासाठी असा एक खास ऑफर आहे. ज्याद्वारे तुम्ही मोफत म्हणजेच एक रुपयाही खर्च न करता ऑनलाइन शॉपिंग करू शकता. हा पर्याय फ्लिपकार्ट शॉपिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. चला तर या पर्यायाबद्दल सर्व काही जाणून घेऊयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोफत ऑनलाइन खरेदी करा!
तुम्हाला फ्लिपकार्टवरून एक रुपयाही खर्च न करता लाखोंची खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर पे लेटर हा पर्यात उपलब्ध करून देण्यात आला आहे. याद्वारे तुम्ही एक लाख रुपयांपर्यंत खरेदी करू शकता आणि वस्तू घरी मागवू शकता. पण यासाठीचे पैसे तुम्हाला नंतर भरण्याची मुभा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. 


फ्लिपकार्ट पे कसं काम करतं


फ्लिपकार्टचा हा Pay Later पर्याय कसं काम करतो आणि कसं वापरता येईल याबद्दल जाणून घेऊयात. तुम्हाला फ्लिपकार्टवरून तुमच्या आवडीच्या वस्तू खरेदी करताना पे लेटर पर्याय निवडवा लागेल.  तुम्ही ज्या दिवशी वस्तू खरेदी केली असेल,  त्या वस्तूचे पैसे पुढील महिन्याच्या 5 तारखेपूर्वी भरावे लागतील. युजर्स फ्लिपकार्ट पे लेटरचा हा पर्याय आवडीने वापरत आहेत. कारण यामुळे फ्लिपकार्टची कोणतीही आकर्षक ऑफर चुकत नाहीत. ऑफरवेळी तुमच्याकडे पैसे नसले तरीही तुम्ही वस्तू खरेदी करू शकता आणि नंतर पैसे देऊ शकता. तसेच, ऑनलाइन पेमेंट किंवा सीओडीचा कोणताही त्रास होत नाही.