नवी दिल्ली : तुम्हाला एखाद्या व्यक्तीला कॉल करायचा आहे. मात्र तुमचा नंबर त्या व्यक्तीला कळू नये, असे जर तुम्हाला वाटत असेल तर चिंता करू नका, त्यासाठी देखील पर्याय आहे. तुम्हाला वाटत असेल हे कसे शक्य आहे, पण हे शक्य आहे. कसे ते पाहुया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला कॉल केल्यावर तुमचा नंबर त्या व्यक्तीकडे जाणार नाही. त्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला कॉलबॅकही करू शकणार नाही.


यासाठी काय कराल ?


सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये गूगल प्ले स्टोरवरून Indycall नावाचे अॅप इंस्टॉल करा. इंस्टॉल झाल्यानंतर ओपन करा. एक नवीन पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यावर काही अटी आणि शर्तींसाठी सहमती मागण्यात येईल. त्यानंतर फोनमध्ये कॉनटेक्ट्स इत्यादींचा एक्सेस मागण्यात येईल आणि या अॅपसाठी तुम्हाला ते द्यावे लागेल. जर तुम्ही एक्सेस दिला नाही तर हे अॅप काम करणार नाही. त्यानंतर तुम्हाला समोर किपॅड दिसेल.


कोड लावणे गरजेचे


आता या किपॅडवर तुम्हाला कॉल करायचा असलेला नंबर डायल करा. मात्र नंबर डायल करण्यापुर्वी  +91 (इंडियाचा कंट्री कोड)  आठवणीने डायल करा. या कोड लावल्यामुळेच नंबर बाबतीत गुप्तता राखण्यात येईल. हा कोड डायल न केल्यास नंबर गुपित राहणार नाही.