नवी दिल्ली : मोबाईल फोन वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच सर्व कपन्यांचे कॉल रेट कमी होण्याची शक्यता आहे. जिओमुळे सर्वच कंपन्यांना स्पर्धेत राहण्याठी कॉल रेट कमी करावे लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार कॉल रेटमध्ये कमी इंटरकनेक्ट यूजेस चार्जेस 14 पैशांवरुन 10 पैशे प्रति मिनिट होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांकडून आकारण्यात येणाऱ्या कॉल रेट कमी होण्याची शक्यता आहे.


जिओ कंपनी रोज रोज नव्या ऑफर बाजारात आणता आहे. जिओने मोठ्या प्रमाणात ग्राहक आपल्याकडे आकर्षित केले आहे. त्यामुळे इतर कंपन्यांना आपले ग्राहक बांधून ठेवण्यासाठी कॉल रेट कमी करावे लागणार आहे.