1 Tweet Loss Of 3500 Cr In 2 Hours: भारतीय कोट्याधीश आणि थायरोकेअरचे संस्थापक डॉक्टर ए वेल्लूमणी यांनी आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन एक प्रश्न उपस्थित केला आहे. ओला कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर याचा संबंध वेल्लूमणी यांनी ओलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अगरवाल (Ola CEO Bhavish Aggarwal) आणि कॉमेडियन कुणाल कामरामध्ये (Kunal Kamra) झालेल्या वादाशी जोडला आहे.


नेमका वाद काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुणाल कामराने एक्सवरुन ओला  कंपनीवर जाहीरपणे टीका केल्यानंतर या प्रकरणाचं रुपांतर वादात झालं. कुणाल कामराच्या या पोस्टला भाविश अगरवाल यांनी फारच वेगळ्या पद्धतीने रिप्लाय दिला. त्यानंतर या दोघांमध्ये एक्सवरच शाब्दिक बाचाबाची झाली. दोघांमधील तणाव वाढला गेला. कुणाल कामराने ओला कंपनीच्या सर्व्हिस सेंटरची संख्या कमी असून असमाधानी ग्राहकांना परतावा न मिळणे अयोग्य असल्याचं कामारचं म्हणणं होतं. त्यांच्या या पोस्टवरुन सीईओ भाविश अग्रवाल चांगलेच संतापले आणि त्यांनी कुणाल कामराला उद्धट शब्दांमध्ये उत्तर दिलं. एवढी काळजी असेल तर आमच्या इथे कामाला येत तुझ्या शोमधून जितके पैसे मिळता त्यापेक्षा जास्त पैसे देईन, असं उत्तर दिलं. कंपनीच्या मालकाचा हा आवतार पाहून ओलाचे ग्राहक अधिकच संतापले. अनेक ग्राहकही आपली व्यथा यानंतर मांडली. 


कंपनीविरुद्ध नाराजी


कुणाल कामरा आणि भाविश अग्रवाल यांच्यातील वादामुळे ओलाची सेवा किती नकृष्ट आहे यावरुन ग्राहकांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. विक्रीनंतर दिली जाणारी आफ्टर सर्व्हिस, इतर समस्या, विशेषत: परतावा आणि सर्व्हिस सेंटर्सची कमी संख्या हा सारा पसारा ग्राहकांनी मांडला. भाविश अग्रवाल यांनी आक्रमकपणे उत्तर दिल्याने सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात नाराजीचा सूर दिसून आला आणि त्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवरही झाला. 


नक्की वाचा >> ₹100755540000 चा मालक पण संवेदना शून्य! टाटांना श्रद्धांजली वाहताना म्हणाला, 'Ok Tata bye bye'; पोस्ट वाचून...


₹35000000000 चा फटका          


कुणाल आणि भाविश यांच्या वादानंतर ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीला (Ola Electric Mobility) बसला असून शेअर्स 8 टक्क्यांनी घसरले. कंपनीला सलग अनेक दिवस फटका बसला आहे. पहिल्या तीन दिवसांमध्ये सहा ट्रेडिंग सेशनमधील पाचमध्ये त्यांच्या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. हे पाहूनच वेलूमणी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत या प्रकरणामुळे ओलाला 3500 कोटींचा फटका बसल्याचं सूचक पद्धतीने नमूद केलं आहे. "केवळ दोन तासांमध्ये 3500 कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं का? किंवा याचा काही वेगळा अर्थ निघतो का?" असा सवाल वेलूमणी यांनी विचारला आहे.




सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.