ट्विटरने आणखी नवं आणलं हे फिचर, जाणून घ्या याबद्दल
सोशल मीडियावर आघाडीवर असणाऱ्या ट्विटरने आपल्या युजर्ससाठी दररोज नवं काहीतरी देण्याचा प्रयत्न सुरुच ठेवलाय.
मुंबई : सोशल मीडियावर आघाडीवर असणाऱ्या ट्विटरने आपल्या युजर्ससाठी दररोज नवं काहीतरी देण्याचा प्रयत्न सुरुच ठेवलाय. आता ट्विटरने डिस्प्ले नाव लिहिण्याची मर्यादा वाढवलेय. त्यामुळे तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव लिहता येणार आहे.
याबाबत ट्विटरने ट्विट केलेय. ट्विटरने याआधी पोस्ट करण्याची शब्दमर्यादा १४० वरून २८० केली. आता त्यापुढे जाऊन ट्विटरने डिस्प्ले नाव लिहिण्याची शब्दमर्यादा २० वरुन ५० केलेय. या नव्या अपटेडमुळे युजर्स आता त्यांचे पूर्ण नावही लिहू शकतात.
याआधी युजर्सला २० शब्दांत डिस्प्ले नाव लिहिताना मर्यादा येत होती. त्यामुळे अनेकांना नावाचा शॉर्टकट वापरावा लागत होता. ही अडचण आता दूर होणार आहे. आजपासून युजर संपूर्ण नाव आणि काही इमोजी यांचा वापर करु शकतात.