Charging : वारंवार चार्जिंग करण्याची कटकटच नाही, जाणून घ्या ही सोपी ट्रीक
आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टीं सांगणार आहोत ज्यामुळे मोबाईल पुन्हा पुन्हा चार्ज (Mobile Charging Problems) करण्याच्या समस्येपासून सुटका मिळेल.
मुंबई : स्मार्टफोन (Smartphone) आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. कॉलिंग आणि मेसेजिंग व्यतिरिक्त इतर अनेक कामांसाठी मोबाईलचा वापर केला जातो. मेल असो किंवा ऑनलाइन पेमेंट, अशा प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईलचा वापर होतो. आता या सर्व गोष्टी करण्यासाठी मोबाईलमध्ये चार्जिंग (Charging) असणं अत्यंत आवश्यक आहे. पण जेव्हा महत्त्वाचं काम असतं तेव्हाच मोबाईलची बॅटरी संपते किंवा कमी असते.
मोबाईलची बॅटरी लवकर संपण्यामागे आपलीच चूक असते. आपल्या काही सवयींमुळे मोबाईल नीट चार्ज होत नाही. यामुळे चार्जिंग लवकर डिस्चार्ज होते. अनेक वेळा आपण मोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्ज करतो. याचा मोबाईलच्या बॅटरीवरही परिणाम होतो. आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टीं सांगणार आहोत ज्यामुळे मोबाईल पुन्हा पुन्हा चार्ज करण्याच्या समस्येपासून सुटका मिळेल.
चार्जिंग करताना गेमिंग
मोबाईल चार्जिंगला ठेवून गेम खेळण्याची सवय अनेकांना असते. चार्जिंग सुरु असतानाही अनेकांन गेम खेळण्याचा मोह आवरत नाही. तुम्हाला ही जर अशी सवय असेल तर आत्ताच थांबा. चार्जिंग करताना गेम खेळल्याने मोबाईलची बॅटरी लाइफ कमी होते. यामुळे बॅटरी लवकर डेड होऊ शकते.
ओरिजनल चार्जर वापरा
अनेकदा चार्जर विसरल्यानंतर आपण दुसऱ्या व्यक्तीचा चार्जर घेतो. हे फार चुकीचं आहे. आपल्या मोबाईलला ओरिजनल चार्जरनेच चार्जिंग करायला हवी. इतरांच्या किंवा स्वसतात मिळणाऱ्या चार्जरने चार्जिंग केल्यास बॅटरी लाईफ कमी होऊ शकते. याशिवाय बॅटरीशी संबंधित इतर समस्याही येऊ शकतात.
पूर्ण चार्ज होऊ द्या
अनेकदा आपण चार्जिंग करतो पण मोबाईल पूर्ण चार्ज होऊ देत नाही. 30 ते 40 टक्के चार्जिंग झाली रे झाली की मोबाईलवर आपली कामं सुरु करतो. त्यामुळे मोबाईल पुन्हा पुन्हा चार्ज करावा लागतो. अशा स्थितीत जेव्हाही तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावाल तेव्हा तो पूर्ण चार्ज होऊ द्या.