Elon musk G20 Summit 2022: गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक कारच्या खरेदी आणि विक्रीत वाढ झाली आहे. इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी पाहता जवळपास सर्वच कंपन्यांनी यात उडी घेतली आहे. इलेक्ट्रिक गाड्यांच्या यादीत टेस्लाचं नाव आघाडीवर आहे. भारतीय बाजारपेठ पाहता टेस्ला भारतात येण्यास उत्सुक देखील आहे. यासाठी केंद्र सरकारसोबत वाटाघाटी देखील सुरु आहेत. पण टेस्लाच्या गाड्यांची किंमत आणि आयात शुल्क पाहता किंमती गगनाला भिडतील. त्यामुळे टेस्लाच्या गाड्यांचं उत्पादन देशातच करावं अशी भूमिका सरकारने घेतली आहे. अशी स्थिती असताना टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी मोठी घोषणा केली आहे. भारतासाठी परवडणारी टेस्ला कार बनवणार असल्याचं एलोन मस्क यांनी सांगितलं आहे. इंडोनेशियामध्ये सुरु असलेल्या G20 समिट बैठकीत त्यांनी याबाबतची माहिती दिली. भारत आणि इंडोनेशियासारख्या बाजारपेठांसाठी स्वस्त मॉडेल तयार केलं जाईल, असं मस्क यांनी सांगितले. 


काय म्हणाले एलॉन मस्क


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एलॉन मस्क यांनी सांगितलं की, "आम्हाला वाटते की परवडणारी वाहने बनवल्यास खूप फायदा होईल आणि आपण असे काहीतरी केले पाहिजे." दुसरीकडे, एलॉन मस्क भारत सरकारकडे टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारवर कर सवलत देण्याची विनंती करत आहेत. मात्र, भारत सरकारने स्पष्ट नकार दिला आहे. कंपनीने सरकारशी चर्चा करण्यासाठी आपली उपकंपनी बेंगळुरूमध्ये स्थापित केली आहे. 


Toyota Innova Hycross लवकरच होणार लाँच, छताला असतील AC वेंट्स! जाणून घ्या इतर फीचर्स आणि किंमत


भारतात आयात शुल्क परवडेना


सध्या, भारत 40 डॉलर पेक्षा जास्त किंमत असलेल्या आयात कारवर 100% कर आकारला जातो. यापेक्षा कमी किमतीच्या वाहनांवर 60% कर आकारला जातो. वापरलेल्या आयात केलेल्या कारसाठी कर 125% आहे.