मध्यमवर्गींयांसाठी आनंदाची बातमी! 360-डिग्री कॅमेरा असलेल्या 10 स्वस्त कार
Cheapest Cars with 360 Degree Cameras:चांगले फिचर्स असलेल्या कारच्या किंमती 10 लाखांच्या वर गेल्या आहेत. पण आम्ही तुम्हाला काही पर्याय देणार आहोत. जे तुमच्या खिशाला परवडणारे असून फिचर्सच्या बाबतीतही तुम्हाला खूष करणारे असतील. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Affordable Cars With 360-Degree Camera: सर्वोत्तम फिचर्स असलेली कमी किंमतीतील कार घ्यावी असे अनेकांना वाटते. पण अनेकदा हे शक्य नसते. कारण चांगले फिचर्स असलेल्या कारच्या किंमती 10 लाखांच्या वर गेल्या आहेत. पण आम्ही तुम्हाला काही पर्याय देणार आहोत. जे तुमच्या खिशाला परवडणारे असून फिचर्सच्या बाबतीतही तुम्हाला खूष करणारे असतील. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
कारमधील 360-डिग्री कॅमेरा ही प्रणाली कारच्या सभोवतालचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन तुम्हाला दाखवते. ही यंत्रणा अनेक कॅमेऱ्यांवर आधारित आहे. म्हणजेच यासाठी कारमध्ये आणि कारच्या वेगवेगळ्या भागांवर कॅमेरा बसवले आहेत. या कॅमेऱ्यांमधून मिळालेले फुटेज एकत्र करून दाखवले जाते, ज्यामुळे 360-डिग्री व्ह्यू मिळतो. हे सुरक्षेचे वैशिष्ट्य म्हणून देखील कार्य करते.
360-डिग्री कॅमेरा ड्रायव्हरला कारच्या सभोवतालची परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतो. गाडी पार्किंगला लावणे, मागे घेणे आणि रस्त्यावरील इतर वाहने आणि वस्तू शोधण्यात मदत करते. दरम्यान आपण देशातील 360-डिग्री कॅमेरे असल्या सर्वात स्वस्त कारबद्दल जाणून घेऊया.
360-डिग्री कॅमेऱ्यांसह सुसज्ज स्वस्त कार
1. निसान मॅग्नाइट (सुरुवातीची किंमत 6 लाख रुपये)
2. मारुती बलेनो (सुरुवातीची किंमत रु. 6.61 लाख)
3. टोयोटा ग्लान्झा (सुरुवातीची किंमत रु. 6.81 लाख)
४. मारुती फ्रॉन्क्स (सुरुवातीची किंमत 7.46 लाख)
5. टाटा नेक्सॉन (सुरुवातीची किंमत रु 8.10 लाख)
6. मारुती ब्रेझा (सुरुवातीची किंमत रु 8.29 लाख)
7. मारुती ग्रँड विटारा (सुरुवाती किंमत रु. 10.70 लाख)
8. MG Astor (सुरुवातीची किंमत रु. 10.82 लाख)
9. Toyota Hyrider (सुरुवातीची किंमत रु. 10.86 लाख)
10. मारुती XL6 (सुरुवातीची किंमत रु. 11.56 लाख)
कारमधील 360-डिग्री कॅमेराचे फायदे
360-डिग्री कॅमेरामुळे ड्रायव्हरसाठी कार पार्किंग सुलभ आणि सुरक्षित होण्यास मदत होते. ड्रायव्हर त्यांच्या कारच्या आजूबाजूचे दृश्य पाहू शकतात. यामुळे त्यांना पार्किंगची जागा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि अधिक अचूकपणे पार्क करण्यास मदत होते.
360-डिग्री कॅमेरामुळे कार मागे घेणे सोपे होते. यासोबतच कार सुरक्षित राहण्यास मदत होते. यामध्ये तुम्हाला कारच्या मागील बाजूची माहिती मिळते आणि तुम्ही कार सुरक्षितपणे रिव्हर्स घेऊ शकता.