मुंबई : भारतीय बाजारात ऑटोमोबाईल कंपनींनी इलेक्ट्रिक गाड्या उतरवायला सुरुवात केली आहे. मात्र त्यांची किंमत पहाता ती सामान्य माणसांना परवडनारी नाही. बाजारात इलेक्ट्रिक गाड्यंची किंमत सामान्य पेट्रोल आणि डिझेल गाड्यांपेक्षा ही जास्त आहे. त्यामुळे लोकांना पेट्रोल आणि डिझेल गाड्यांना पर्याय असला तरीही तो फायदेशीर नाही. आता  2021मध्ये बाजारात असे options आले आहेत जे सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Strom Motors कंपनी लवकर बाजारात अशी गाडी लाँच करत आहे, ज्याची किंमत 4.5 लाख रुपये आहे.


Strom Motors कंपनी  Strom R3 कार बाजारात लाँच करत आहे. ही  थ्री-व्हीलर इलेक्ट्रिक कार आहे, ज्याला 2-दरवाजे, 2-सीट्स आणि मोठा सनरुफ दिला आहे. या कार ची किंमत 4.5 लाख रुपये आहे आणि ही भारतात मिळणाऱ्या इलेक्ट्रिक कारपैकी सगळ्यात स्वस्त कार आहे.


10 हजारात करा बुकिंग
Strom R3 कारमध्ये लिथियम-आयन बॅटरीचा वापर केला आहे, आणि ही कार 1 लाख किलोमीटर किंवा 3 वर्षांच्या  वॅारंटी सोबत बाजारात येणार आहे. कंपनीने 10 हजार रुपयांच्या टोकन अमाउंट सोबत या कारची बुकिंग सुरु केली आहे. तुम्ही ऑनलाईन या कारची बुकिंग करु शकता. येत्या काही महिन्यांमध्ये  ही कार लाँच करण्यात येणार आहे.


एकदा चार्ज केल्यावर धावते 200 किलोमीटर
Strom Motors कंपनीचा दावा आहे की Strom R3 कार एकदा चार्ज केल्यावर  200 किलोमीटर पर्यंत धावते. ही गाडी चालवायला प्रति किलोमीटर मागे 0.40 पैसे इतका खर्च येतो. ही गाडी टच स्क्रीन आहे. आधिक माहितीसाठी https://www.strommotors.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.


गाडीचे वजन 550 किलो आहे
Strom R3 कारचे वजन 550 किलो आहे. गाडीत ऑनबोर्ड चार्जर दिला आहे. या गाडीच्या पुढच्या बाजुला 100 लिटर आणि मागच्या बाजूला 300 लिटर बूट स्पेस दिला आहे.