तुमच्या Aadhaar Cardवर किती नंबर रजिस्टर आहेत? हे कसे पाहावे? माहित करुन घ्या
आधार कार्डवर नोंदणीकृत फोन नंबर तुम्ही विसरला आहात आणि तो कसा शोधायचा अशा विचार करत आहात?
मुंबई : आपल्या आधार कार्ड (Adhaar Card) वर नोंदणीकृत फोन नंबर तुम्ही विसरला आहात आणि तो कसा शोधायचा अशा विचार करत आहात? तर आता जास्त विचार करण्याची गरज नाही, कारण दूरसंचार विभागाने (DoT) सुरू केलेल्या पोर्टलद्वारे हे शक्य आहे. ज्यामुळे व्यक्ती त्याच्या नंबरवर किती फोन नंबरची नोंद झाली आहे. हे तपासू शकतात. यामध्ये तुमच्याकडे नसलेला किंवा तुम्ही वापरत नसलेला नंबर देखील तुम्ही बंद करू शकता.
हा पोर्टल सध्या फक्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उपलब्ध
DoT ने एप्रिलमध्ये टेलीकॉम एनालिटिक्स फॉर फ्रॉड मैनेजमेंट एंड कंज्यूमर प्रोटेक्शन (TAFCOP) पोर्टल लॉन्च केले आहे. या माध्यमातून टेलीकॉम सब्सक्राइबर्स आपल्या आधारकार्ड सोबत नोंदणीकृत फोन नंबर शोधू शकतात.
हे पोर्टल सध्या फक्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उपलब्ध आहे, दूरसंचार मंत्रालयाने नमूद केले आहे की, हे लवकरच देशातील सर्व ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाईल.
FAQ पेजनुसार, TAFCOP पोर्टलला ग्राहकांना मदत करण्यासाठी, त्यांच्या नावावर कार्यरत मोबाईल कनेक्शनची संख्या तपासण्यासाठी आणि आवश्यक कारवाई करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.
ग्राहक 9 पर्यंत मोबाईल कनेक्शनची नोंदणी करू शकतात.
DoT च्या निर्देशानुसार प्रत्येक ग्राहक 9 पर्यंत मोबाईल कनेक्शनची नोंदणी करू शकतो. या मर्यादेनंतर, आपण नवीन कनेक्शन घेतल्यास ते मोठ्या प्रमाणात कनेक्शनसाठी म्हणजे कमर्शल उद्देशाने केलं असल्याचे विचारात घेतले जाईल.
आपल्या आधार क्रमांकावरील सर्व नोंदणीकृत फोन नंबर कसे तपासावेत?
1. TAFCOP पोर्टलला भेट द्या आणि आपला सक्रिय मोबाईल नंबर प्रविष्ट करा.
2. रिक्वेस्ट ओटीपी बटणावर क्लिक करा.
3. आपल्या फोनवर प्राप्त झालेला ओटीपी त्यात प्रविष्ट करा आणि व्हॅलिडेट वर क्लिक करा.
4. TAFCOP पोर्टल आता आपल्याला आपल्या आधार क्रमांकाशी जोडलेले नोंदणीकृत क्रमांक दर्शवेल.