मुंबई : व्हाट्सअ‍ॅप हा आता आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. सध्या, ते चॅटींगसाठी सर्वात लोकप्रिय अ‍ॅप बनले आहे. परंतु तुम्हाला माहित आहे की, या अ‍ॅपवर अशा काही सेटिंग्ज आहेत. ज्या आपल्या फोनसाठी धोकादायक असल्याचे समोर आले आहे. तुम्ही जर या सेटिंग्ज बदलल्या नाहीत तर तुमचा फोन हॅक केला जाऊ शकतो. या कोणत्या सेटिंग्ज आहेत आणि तुमच्या फोनला त्यामुळे काय धोका आहे याबद्दल जाणून घ्या.


Disappearing messages


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फीचर आहे ज्यामध्ये मॅसेज गायब होतो (Disappearing messages) हे यूझर्ससाठी लवकरच सुरू होणार आहे. या फीचरद्वारे आपले मॅसेज ऑटोमॅटीक हटवले जातील. परंतु गोपनीयतेच्या दृष्टीने हे एक धोकादायक फीचर आहे.


तथापि, अ‍ॅपमधील हे ऑटोमॅटीक हटवलेले मॅसेज कमीतकमी 7 दिवस राहतील. अशा परिस्थितीत आपले संदेश नोटिफिकेशनमध्येच राहतात, तसेच हे मॅसेज दुसर्‍या यूझर्सद्वारे कॅप्चर केले जाऊ शकतात. तसेच, प्राप्तकर्ता आपला संदेश बॅकअपमध्ये ठेवू शकतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोणातून हे फीचर हटवा.


डीफॉल्ट सेव्ह इमेजेस


आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे फोटो किंवा व्हिडीओ ऑटोमॅटीक सेव्ह केले जात असल्यास, तत्काळ ही सेटिंग बदला. वास्तविक, सायबर तज्ज्ञांच्या मते, फोटो कधीकधी ट्रोजन हॉर्ससारखे (Trojan horse)  कार्य करतात. याच्या मदतीने हॅकर्स तुमचा फोन अगदी सहजपणे हॅक करू शकता.


हे टाळण्यासाठी त्वरित आपल्या व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्जवर जा. चॅट्सवर क्लिक करुन सेव्ह टू कॅमेरा रोल बंद करा.


WhatsAppचा बॅक  iCloud वर घेऊ नका


आतापर्यंत असे म्हटले जात आहे की Appleची सीक्यॉरिटी सर्वात मजबूत आहे. पण तज्ञांचे मत आहे की, व्हॉट्सअ‍ॅपला कधीही iCloud मध्ये बॅक अप करु नये. तुम्ही कोणताही व्हॉट्सअ‍ॅप चॅट iCloud मध्ये हलवला की, ती Appleची प्रॉपर्टी बनते.


तुमचे चॅटचे एकदा iCloudमध्ये प्रवेश झाल्यावर, ते decrypted होतात. म्हणजेच, सुरक्षा संस्था तुमच्या गोष्टी किंवा चॅट अ‍ॅपलमधून घेऊ शकतात. या कारणास्तव तज्ज्ञांनी iCloudमध्ये बॅकअप घेण्यास नकार दिला आहे.