मुंबई : स्मार्टफोन स्वच्छ करण्यासाठी अनेकदा अनेकजण घरगूती वस्तुंचा वापर करतात. जस कोणत्याही ओल्या कपड्याने डिस्प्ले आणि स्पिकर साफ करत असतात. मात्र त्यांची हीच पद्धत त्यांच्या मोबाईलसाठी नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे नेमकी मोबाईलची साफसफाई कशी करावी हा प्रश्न समोर येत आहेत. चला जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माइक्रोफाइबर क्लोथ
जर तुम्हाला तुमचा स्मार्टफोनचा डिस्प्ले साफ करायचा आहे तर घरात पडलेले कोणतेही कापड वापरू नका. कारण काही लोक असेच कोणतेही जुने कापड वापरतात आणि त्यानंतर त्याच्या स्मार्टफोनच्या डिस्प्ले आणि बॉडीला स्क्रॅच येते. त्यामुळे  डिस्प्ले साफ करण्यासाठी नेहमी मायक्रोफायबर कापड वापरावे, ते मऊ असते तसेच धुळीचे कण चांगले शोषून घेतात.


अल्कोहोल क्लिनर वापरा
काही लोक स्मार्टफोन स्वच्छ करण्यासाठी वॉटर बेस्ड क्लिनरचा वापर करतात, मात्र असे केल्याने स्मार्टफोन खराब होऊ शकतो. वास्तविक, वॉटर क्लीनर तुमच्या स्मार्टफोनमध्ये जातात आणि येथे गोठतात, ज्यामुळे तुमच्या स्मार्टफोनमध्ये पाण्याचे नुकसान होऊ शकते. यामुळे केवळ डिस्प्ले, मायक्रोफोन खराब होत नाही, तसेच स्मार्टफोनचे सर्किटही खराब होऊ शकते आणि ते पूर्णपणे काम करणे थांबवू शकते.


वरील दोन्ही गोष्टी जर तु्म्ही वापरल्यात तर तुमचा स्मार्टफोनला कोणतेही नुकसान होणार नाही. त्यामुळे तुम्ही याचा वापर करून एकदा पाहा.