Crossbeats Calling Smartwatch: क्रॉसबिट्सनं नवीन स्टाईलिश स्मार्टवॉच लाँच केलं आहे. या स्मार्टवॉचमध्ये जीपीएस आणि कॉलिंग फीचर आहे.  क्रॉसबिट्सनं Ignite ATLAS लाँच करून आपल्या स्मार्टवॉच लाइनअपमध्ये भर घातली आहे. हाय प्रिसिजन ड्युअल-सॅटेलाइट ग्लोनास जीपीएससह ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच आहे. स्मार्टवॉच जीपीएस युजर्संना थेट नेव्हिगेट करण्यास अनुमती देईल. क्रॉसबिट Ignite ATLAS सध्या फक्त crossbeats.com वर 4,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रॉसबीट्स Ignite ATLAS तपशील


क्रॉसबीट्स Ignite ATLAS मध्ये 500 नीट्सचा कमाल ब्राइटनेससह एक जबरदस्त 1.69-इंच एचडी डिस्प्ले आहे. स्मार्टवॉच वापरकर्त्यांना कमी ब्राइटनेस आणि खराब प्रकाश दृश्यमानतेत याचा उपयोग होईल. तसेच आरोग्य मेट्रिक्सवर लक्ष ठेवणे. क्रॉसबीट्स Ignite Atlas मध्ये वापरकर्त्यांना 30 प्रीसेट स्पोर्ट्स मोड्स दिले आहेत. धावणे, बाइकिंग आणि पोहण्यासारख्या व्यायामाशी सर्वात संबंधित डेटा दाखवण्यास सक्षम आहे.


क्रॉसबीट्स Ignite ATLAS बॅटरी


क्रॉसबीट्स Ignite ATLAS शक्तिशाली बॅटरीसह येते. बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 10 दिवस नॉन-स्टॉप टिकू शकते. हे स्मार्टवॉच विविड ब्लॅक आणि इम्पीरियल ब्लू सारख्या क्लासिक रंगांमध्ये येते. या स्लीक आणि क्लासी स्मार्टवॉचमध्ये 100 पेक्षा जास्त वॉच फेस आहेत, जे दररोज एक नवीन लुक देतात.