बँकेचा चेक देण्याघेण्या अगोदर हे नक्की वाचा, RBI कडून बँकांना मोठा बदल करण्याचे आदेश
तुम्ही अजूनही जुनेच चेकबुक वापरत का? वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे.
मुंबई : तुम्ही अजूनही जुनेच चेकबुक वापरत का? वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) चेक क्लिअरिंग संदर्भात मोठं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या चरणांद्वारे धनादेशांचे वेगवान देय ग्राहकापर्यंत पोहचवू शकते. सेवा सुधारता येईल म्हणून हा मोठा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
अद्यापही 18 हजार बँक क्लियरिंग सिस्टमच्या बाहेरच...
अद्यापही 18 हजार बँक शाखा आशा आहेत, ज्या क्लियरिंग सिस्टच्या बाहेर आहेत. त्या बँकांना सीटीएसमध्ये आणलं जाणार आहे. सध्या देशातील काही शहरांमध्येचं सीटीएस पद्धती चेक पाठवण्यासाठी वापरली जाते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चेकच्या माध्यमातून टाकलेले पैसे वेगाने तुमच्या खात्यात जमा व्हावेत यासाठी, सीटीएस पद्धत प्रणाली लागू केली आहे. यामुऴे तो चेक दुसऱ्या बँकेत घेऊन जाण्याची गरज नाही. चेक ऐवजी त्याची डिजिटल प्रतिमा दुसऱ्या बँकेत पाठवली जाते. चेक वेरीफाय झाल्यानंतर ते पैसे ग्राहकाच्या खात्यामध्ये जमा केले जातात.
2010 पासून सीटीएसचा वापर
सीटीएसचा वापर देशात 2010 पासूनच सुरु करण्यात आला आहे. 1.50 लाख बँक शाखेत याचा उपयोग केला जातो. केंद्रीय बँकांनी चेक व्यवहार सुरक्षित होण्यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम सुरु केली आहे. ही प्रणाली 1 जानेवारी 2021 पासून सुरु झाली आहे. याअंतर्गत 50 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा चेक वटवला जाणार आहे. सध्या 1.50 लाख बँक शाखांमध्ये सीटीएस सुविधा सुरु आहे.
रिझर्व्ह बँकेचं परिपत्रक
रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, सीटीएसचा वापर सर्व ग्राहकांना समान अनुभव मिळावा यासाठी देशभरातील सर्व बँक शाखांमध्ये लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत सर्व बँकांनी याची खात्री करुन घ्यावी की 30 सप्टेंबर 2021 पर्यंत सर्व बँक शाखांनी सीटीएस प्रणालीत समाविष्ट केली जाईल. यासाठी बँका कोणत्याही मॉडेलचा अवलंब करण्यास स्वतंत्र असतील. यासाठी बँका प्रत्येक शाखेत योग्य रचना ठेवू शकतात.