एअरटेल विरोधात ग्राहकांनी केली तक्रार, चौकशीचे आदेश
आधार अॅक्टचं उल्लंघन केल्यामुळे भारती एअरटेलला नोटीस पाठवण्यात आली आहे.
नवी दिल्ली : आधार अॅक्टचं उल्लंघन केल्यामुळे भारती एअरटेलला नोटीस पाठवण्यात आली आहे.
एअरटेल विरोधात चौकशीचे आदेश
यूनीक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) एअरटेल विरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. एअरटेलवर आरोप आहे की, ग्राहकांच्या मोबाइल नंबरवर आधार वेरिफिकेशन केलं गेलं आणि त्यादरम्यान कंपनीने ग्राहकांचं एअरटेल पेमेंट बँक देखील उघडलीत.
हे प्रकरण तेव्हा समोर आलं जेव्हा एलपीजी सब्सिडी बँकेच्या अकाऊँट ऐवजी एअरटेल पेमेंटमध्ये जमा झाले. अनेक ग्राहकांनी याची तक्रार केली. एअरटेल पेमेंट अकाउंट बद्दल कोणतीच माहिती नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे.
एअरटेलला नोटीस
सूत्रांच्या माहितीनुसार, एअरटेलविरोधात UIDAIने चौकशीचे आदेश दिले आहेत. हा तक्रार सुरुवातील सत्य असल्याचं समोर आलं आहे. आरोप असा आहे की, हे विश्वासाचं उल्लंघन आहे आणि आधार अॅक्ट नुसार देखील हे नियमांचं उल्लंघन आहे. केंद्र सरकारच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर (DBT) योजनेच्या अंतर्गत पाठवली जाणारी सबसिडीची रक्कम ही ४० कोटींच्या वर आहे. तक्रार मिळाल्यानंतर UIDAIने एअरटेलला नोटीस पाठवली आहे.
UIDAIचे सीईओ अजय भूषण पाण्डेय यांनी म्हटलं की, आधार वेरिफिकेशन प्रोसेस दरम्यान दूरसंचार कंपन्यांविरोधात तक्रारी मिळाल्या. याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. जर तक्रारी खऱ्या निघाल्या तर याविरोधात कारवाई केली जाईल.
एअरटेलचं म्हणणं
एअरटेलचे प्रवक्त्यांनी म्हटलं की, कंपनीने कोणत्याही प्रकारची गडबडी नाही केली नाही. ते त्यांच्या रिटेल पार्टनर सोबत काम करत आहेत. कारण पारदर्शकता आणली जावी.