तुम्हाला Online Fraudला बळी पडायचं नसेल, तर Internet वापरताना या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या
सगळ्यांना त्यांचा फोन आणि लॅपटॉप वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
मुंबई : आजकाल ऑनलाइन फ्रॉडचे प्रकरण पुन्हा वाढले आहेत. अशा परिस्थितीत लोकांनी सावध राहण्याची खूप गरज आहे. कारण आजच्या टेक्नोलॉजीप्रमाणे हॅकर्स देखील खूप पुढे गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे असे बरेच मार्ग आहेत ज्याद्वारे ते आपल्या वैयक्तिक गोष्टींवर आक्रमण करू शकतात आणि आपली माहिती मिळवू शकतात. म्हणूनच सगळ्यांना त्यांचा फोन आणि लॅपटॉप वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगत आहोत. ज्या तुम्हाला ऑनलाईन फसवणूक आणि हॅकर्सपासून वाचवतील. चला जाणून घेऊ या.
विनामूल्य वाय-फाय वापरणे टाळा
तुम्ही मुक्त Wifi वापरणे टाळले पाहिजे. तसेच ऑनलाइन पेमेंट किंवा बँकिंगसाठी तरी विनामूल्य वाय-फाय वापरू नका असा सल्ला सायबर तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
URL वर लक्ष द्या
कोणतीही वेबसाइट उघडताना काळजी घ्या. त्याच्या URL वर विशेष लक्ष द्या.
जर URL https सह प्रारंभ होत नसेल, तर मग समजून जा की, ही वेबसाइट सुरक्षित नाही. या प्रकारच्या वेबसाइटला भेट देऊ नका, ती आपली वैयक्तिक माहिती चोरून घेऊ शकते.
प्रत्येक अकाउंटसाठी स्वतंत्र पासवर्ड ठेवा
बर्याचदा लोकं त्यांच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर सारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करताना त्यांचे पासवर्ड एकच ठेवतात.
कारण वेगवेगळे पासवर्ड लक्षात ठेवणे अवघड आहे, परंतु तसे करणे ही तुमची मोठी चूक ठरु शकते.
जर हॅकर्सना एखाद्या प्रकारे तुमचा एखादा जरी पासवर्ड माहित पडला, तर त्यांना तुमते सर्व संकेतशब्द माहित असतील. म्हणूनच भिन्न खात्यांसाठी भिन्न संकेतशब्द ठेवणे फार महत्वाचे आहे.
सर्व फायलीचे बॅकअप असल्याचे सुनिश्चित करा
- बर्याचदा लोक लॅपटॉप, फोन किंवा कंप्यूटरवर फाईल्सचा बॅकअप घेत नाहीत. तुम्ही हे करत नसल्यास हे जाणून घ्या की, असे केल्याने ही फाईल हटविली किंवा नष्ट होऊ शकते.
म्हणून, वेळोवेळी आपल्या महत्वाच्या फायलीचे बाह्य ड्राइव्हमध्ये बॅकअप घ्या. असे केल्याने तुमच्या फाईल्सवर Ransomware चा हल्ला टाळण्यास सक्षम असाल.