Cyber Crime News In Marathi: नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने अनेकजण आपले राहते घर सोडून शहरात येतात. पण शहरांमध्ये राहण्यासाठी घर शोधणे त्रासदायक असते. भाड्याचे घर (House On Rent) घेत असताना आजूबाजूचा परिसर, जागा, सोसायटी हे सगळं ठरवूनच घेतलं जाते. मात्र, कोणतीही ओळख नसताना किंवा मध्यस्थी नसताना घर घेताना आपली फसवणूक केली जाते. अलीकडेच घर शोधण्यासाठीही इंटरनेटवरुन मदत घेतली जाते. मात्र, एका व्यक्तीला ऑनलाइन भाड्याचे घर (Flats for Rent Fraud) शोधणे महागात पडले आहे. या व्यक्तीने आपली सर्व जमापुंजी गमावली आहे. (Cyber Crime News Today)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवभूमी उत्तराखंड येथे राहणारा एक व्यक्ती सायबर फ्रॉडचा शिकार ठरला आहे. देहरादून येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला नोएडा येथे नोकरी मिळाली होती. त्यानंतर त्याने नोएडा येथे भाड्याचे घर शोधत होता. त्यासाठी त्याने ऑनलाइन प्लॅटफॉर्मची मदत घेतली. त्याला ऑनलाइन सर्च करताना एक ब्रोकर सापडला. त्यानंतर घराविषयी सर्व चर्चा झाल्यानंतर तो रेंटल अॅग्रिमेंट करण्यासाठी तयार झाला. त्यानंतर या व्यक्तीच्या खात्यातून 1.50 लाख रुपये लंपास केले आहेत. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीचे नाव गौरव जोशी आहे. नोकरीच्या निमित्ताने तो देहरादूनहून नोएडा येथे शिफ्ट होणार होता. त्यानंतर त्याने एक भाड्याने घर शोधण्याची तयार सुरु केली. ऑनलाइन सर्च केल्यानंतर त्याला विकास गुप्ता नावाच्या व्यक्तीसोबत संपर्क झाला. विकासने त्याला एका घराबाबत सांगितले. त्याचबरोबर प्रति महिना 16,000 रुपये भाडे आणि करार बनवण्यासाठी काही रुपयांची मागणी केली. 


जोशी यांचा विश्वास जिंकल्यानंतर ऑनलाइन ब्रोकरने त्यांच्या खात्यात 5 रुपये व एक कुपन पाठवले. त्यानंतर जोशीने कूपन स्कॅन करत अॅग्रीमेंटसाठी पेमेंट केले. त्यानंतर काहीच वेळात जोशी यांना एक मेसेज आला. त्यात म्हटलं होतं की बँक अकाउंटमधून 1.15 लाख रुपये ट्रान्सफर झाले आहेत. त्यानंतर आणखी एकदा ट्रन्सॅक्शन करण्यात आली. यात जोशी एकूण 1.50 लाख रुपयांचा फटका बसला आहे. 


अकाउंटमधून एका पाठोपाठ पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर जोशी यांना काहीतरी वेगळे जाणवले. त्यानंतर त्यांनी चौकशी केल्यास त्यांना आपण ऑनलाइन फ्रॉडचे शिकार झाले आहोत, असं जाणवले. त्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये संपर्क करत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.