नवी दिल्‍ली : मोबाईल आजच्या जगात सर्वात गरजेचा झाला आहे. मोबाईल आजकाल सर्वच प्रकारचे अ‍ॅप्लीकेशन्स उपलब्ध असतात. पण जर एका सर्व्हेवर विश्वास ठेवायचा तर भारतातील तरूण मोबाईल अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून लग्न नाही तर डेटिंग करणे जास्त इंटरेस्टेड आहेत. 


काय म्हणाले लोक?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी जारी करण्यात आलेल्या एसोचॅमच्या सर्व्हेतून असाच काहीसा खुलासा झाला आहे. एसोमॅच यांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, एकूण उत्तरदात्यांपैकी साधारण ५५ टक्के लोकांनी उत्तर दिले की, त्यांना परंपरांना बाजूला सारून डेटिंग किंवा कुणाशीतरी कनेक्ट होण्यासाठी डेटिंग अ‍ॅपचा वापर केला.  


डेटिंग करतात कारण ओळख गुप्त असते


एसोमॅचच्या सोशल मीडिया शाखेने चार मेट्रो शहरांसहीत १० मोठ्या शहरांमध्ये २० ते ३० या वयोगटातील एकूण १५०० लोकांवर १ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान ह सर्व्हे करण्यात आला होता. एसोमॅच द्वारे जारी करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, उत्तरदात्यांमध्ये जास्तीत जास्त लोकं म्हणाले की, हे सुरक्षित आहे. कारण यात ते त्यांची ओळख लपवून ठेवू शकतात. अनेक डेटिंग साईट्स आपली ओळख लपवून ऎकमेकांसोबत डेटिंग करण्याची सुविधा देते. 


डेटिंग अ‍ॅपची क्रेझ वाढणार


एसोचॅमचे प्रधानसचिअव डी.एस.रावत म्हणाले की, भविष्यात डेटिंग अ‍ॅपला आणखी जास्त लोकप्रियता मिळेल. कारण यातून ऑनलाईन लोकांना भेटण्याची आणि त्यांच्यासोबत जुळण्याची संधी निर्माण करून देतात. सध्या हे नवीन आहे. आणि याचं मूल्य ५०० कोटी रूपयेही नाहीये. मात्र भारतात वाढत असलेली तरूणांची संख्या ऑनलाईन डेटिंगसाठी पर्याय शोधत आहेत आणि येणा-या काळात हा करोडोंचा व्यवसाय होणार आहे.