नवी दिल्ली : तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, इंडियन ऑटो मार्केटमध्ये Datsun कंपनी आपली नवी आणि स्वस्त SUV Datsun गो क्रॉस लवकरच लॉन्च करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ही कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च होण्यापूर्वी जकार्तामध्ये 18 जानेवारी रोजी लॉन्च होणार आहे. असं म्हटलं जात आहे की, ही नवी आणि स्वस्त SUV Datsun गो क्रॉस नोएडात होणाऱ्या ऑटो एक्सपो 2018 मध्ये लॉन्च करण्यात येणार नाहीये.



कंपनी मार्च ते एप्रिल दरम्यान ही कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च करु शकते. कंपनीने या कारचं नाव आता Datsun Cross असं केलं आहे. या SUVची पहिली झलक इंडोनेशियात पहायला मिळाली होती.



SUV Datsun गो क्रॉसची भारतीय बाजारपेठेत किंमत जवळपास 4.5 लाखांपासून सुरु होणार असल्याचं बोललं जात आहे. या गाडीच्या टॉप मॉडलची किंमत 6.8 लाखांपर्यंत असण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.



मारुतीची सिलेरियो आणि महिंद्राची KUV 100 या गाड्यांना Datsun गो क्रॉस टक्कर देऊ शकेल. सिलेरियोची किंमत 5 लाख आणि KUV 100 जवळपास 5.5 लाखांपासून सुरु होते. म्हणजेच Datsun गो क्रॉस भारतातील सर्वात स्वस्त SUV ठरणार आहे.



Datsun गो क्रॉस ही गाडी पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली जाणार आहे. पेट्रोल व्हेरिएंटचं मायलेज 22KM/L आणि डिझेल व्हेरिएंटचं मायलेज 30KM/L च्या जवळपास असणार आहे.



या गाडीत 7 इंचाची टचस्क्रीन असलेला अॅडव्हान्स स्टिरिओ ब्ल्यूटूथ कनेक्टिविटीसोबत असणार आहे. तर, पॉवर विंडो आणि रियर पार्किंग सेंसर सारखे हायटेक फिचर्सही असणार आहेत.