लेकाच्या लग्नाचं मुकेश अंबानींकडून Jio ग्राहकांना सर्वात मोठं Gift! लोकप्रिय Plan मध्ये...
Anant Wedding Mukesh Ambani Gift To Jio Customers: मागील महिन्यामध्येच जीओने अचानक आपल्या जवळपास सर्वच प्लॅनचे दर वाढवल्याने ग्राहकांना मोठा धक्का दिला होता. मात्र आताची नवी घोषणा म्हणजे ग्राहकांसाठी गुड न्यूज आहे.
Anant Wedding Mukesh Ambani Gift To Jio Customers: जवळपास महिन्याभरापासून अधिक काळ अनंत अंबानींच्या लग्नामुळे चर्चेत असलेला रिलायन्स सध्या जीओसंदर्भातील एका निर्णयामुळे पुन्हा चर्चेत आहे. जीओने अगदीच अनपेक्षितपणे त्यांचा एक सर्वात लोकप्रिय प्रीपेड प्लॅन रिव्हाइज केला आहे. अचानक रिलायन्सने घेतलेल्या या निर्णयाची सध्या जीओच्या युजर्समध्ये चर्चा आहे. आपल्या ग्राहकांकडून वारंवार होणारी मागणी मान्य करत अखेर रिलायन्सने जीओच्या 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये मोठे बदल केले आहेत.
बदल करणार नाही कंपनीने सांगितलेलं
काही दिवसांपूर्वीच रिलायन्सने गॅजेट्स 360 च्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, 349 च्या प्लॅनची व्हॅलिडीटी बदलणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं होतं. हा प्लॅन 28 दिवसांचा असून प्रीपेड केल्यानंतर 28 दिवसांचाच महिना गृहित धरला जाईल आणि एवढीच व्हॅलिडीटी दिली जाईल असं रिलायन्सने सांगितलं होतं. या प्लॅनचा कालावधी वाढवून देण्याचा कंपनीचा कोणताही विचार नाही असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता यासंदर्भात ग्राहकांना खुश करणारा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मोठी दरवाढ
रिलायन्स जीओने मागील काही दिवसांमध्ये आपल्या वेगवेगळ्या प्लॅन्सची दरवाढ केली आहे. मागील महिन्यामध्ये जीओने 1 जीबी पर डेच्या प्लॅनची किंमत 209 वरुन 249 केली. तर दिवसाला दीड जीबी डेटा देणारा प्लॅन 666 वरुन 799 रुपयांना गेला. त्याप्रमाणे दिवसाला अडीच जीबीचा डेटा प्लॅनही 2999 वरुन 3599 वर गेला होता.
नवीन घोषणा काय?
मात्र आता रिलायन्स जीओनं नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार 349 रुपयांच्या प्लॅनमध्येही बदल करण्यात आले आहेत. ग्राहकांनी दिवसांसंदर्भातील कालावधीमध्ये तसेच मेसेजच्या संख्येमध्ये कोणताही बदल करु नये असं कंपनीला फिडबॅकमध्ये कळवलं होतं. त्याचीच दखल कंपनीने घेत मोठा निर्णय घेतला आहे. नव्या बदलानुसार रिलायन्सने जीओच्या प्रीपेडचा कालावधी हा 28 दिवसांच्या व्हॅलिडीटीवरुन 30 दिवसांवर नेला आहे. यामुळे ग्राहकांना फायदा होणार आहे. विशेष म्हणजे हा बदल रिलायन्स जीओच्या हिरो फाइव्ह जी नावाच्या प्लॅनमध्येच करण्यात आला आहे.
ग्राहकांना काय मिळणार?
एक्स वरुन केलेल्या पोस्टमध्ये जीओने 349 च्या प्लॅनची व्हॅलिडीटी आता 30 दिवस असणार आहे. तसेच आता या प्लॅनअंतर्गत 56 जीबी ऐवजी 60 जीबी डेटा दिला जाणार आहे. 2जी डेटामध्ये कोणताही बदल न करता हा अतिरिक्त डेटा देण्यात आला आहे. तसेच स्थानिक जीओ ट्रू फाइव्हजी सेवेअंतर्गत युझर्सला अनलिमिटेड फाइव्ह जी इंटरनेट वापरता येणार आहे.