Dev Joshi SpaceX Starship: लहान मुलांच्या कथेत, कवींच्या कवितेत आणि कल्पना विश्वात रमणाऱ्यांच्या स्वप्नांमध्ये चंद्राला विशेष स्थान असते. याच चंद्राची सफर सत्यात उतरवण्याची किमया शास्त्रज्ञांनी प्रत्यक्षात साकार केली आहे. बच्चे कंपनीचा हिरो असलेला बालवीर(Balveer fame) अर्थात देव जोशी(Dev Joshi) चंद्रावर जाणार आहे.  स्पेस टूर अंतर्गत देव जोशी चंद्राची सफर करणार आहे. 3 लाख लोकांमधून देव जोशीला याला स्पेस टूर(space tour of Japan) करण्याची संधी मिळाली आहे.  देव जोशी याने स्वत: सोशल मीडिया पोस्टद्वारे या स्पेस टूरबाबत माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जपानचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अब्जाधीश असलेल्या  यासुका मीजावा  (Yusaku Maezawa)  यांनी या स्पेस टूरचे नियोजन केले आहे. Elon Musk यांची कंपनी SpaceX रॉकेट द्वारे अंतराळाची सफर घडवणार आहे.  यासुका मीजावा यांनी या टूरचे सर्व तिकीट बुक केले. यानंतर या मून टूरसाठी इच्छुक असलेल्या लोकांकडून त्यांनी अर्ज मागवले. या स्पेस टूरसाठी तब्बल तीन लाख लोकांनी निवेदन दिले. यापैकी सर्वाधिक संख्या ही भारतीयांची आहे. यापैकी आठ जणांची निवड करण्यात आली या आठ लोनांमध्ये देव जोशी याच्या नावाचा समावेश आहे. 


नविन वर्षात ही स्पेस टूर होणार आहे. देव या टूरचा एक सदस्य असणार आहे. स्पेस टूर आठवडाभराची असणार आहे.  स्पेस टूरला जाणाऱ्या या पर्यटकांना अनेक चाचण्यांमधून जावे लागणार आहे. त्यानुसारच यांच्या टूरचे नियोजन केले जाणार आहे. त्यानुसार देव जोशी याची मुलखत घेतली जाणार असून मेडिकल टेस्ट देखील घेतली जाणार आहे. 


अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या विरोधाला न जुमानता  यासुका मीजावा यांनी स्पेस टूरची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न मार्गी लावला आहे.  यापूर्वी SpaceX ने Falcon 9 रॉकेटमधून चार अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला भेट दिली होती. चाचणी दरम्यान स्टारशिपचे दोन प्रोटोटाइप स्फोट देखील झाले होते. यामुळे या स्पेस टूर अत्यंत धाडसी आणि जोखीम असणारी अशीच आहे.