Digital Loan App fraud: ऑनलाइन पेमेंटच्या (online payment) वाढत्या ट्रेंडमध्ये, डिजिटल कर्ज अॅप्सची (digital app loan) संख्या देखील खूप वेगाने वाढली आहे. ज्यामध्ये लोकांनी ऑनलाइन अॅप्सवरून (online app) कर्ज घेतले आणि नंतर पश्चाताप करावा लागला. या डिजिटल (digital payment) अॅप्सद्वारे कर्ज देणाऱ्या बेकायदेशीर कंपन्यांनी लोकांना हैराण केले आहे. (Digital Loan App fraud update)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कंपन्या कर्ज देऊन लोकांना बुडवत आहेत. गेल्या दोन वर्षांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये कर्जाला कंटाळून लोकांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता सरकार या समस्येवर कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे.


 RBI किंवा सरकारची मान्यता


प्ले स्टोअरवर (play store) अनेक ऑनलाइन कर्ज अॅप्स आहेत. यापैकी बहुतेक अॅप्सना RBI ची मान्यता देखील नाही. अनेक वर्षांपासून कोणत्याही नोंदणीशिवाय त्यांचा व्यवसाय करत आहेत. कर्ज दिल्यानंतर या कंपन्या ग्राहकांकडून बेकायदेशीर वसुली करत आहेत. त्यामुळे अनेकजण नाराज झाले आहेत. अशा परिस्थितीत या कंपन्यांच्या छळामुळे देशात आत्महत्येच्या घटना वाढत आहेत.


अर्थ मंत्रालय आता कारवाई करणार 


नुकतीच अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये RBI सर्व कायदेशीर अॅप्सची यादी तयार करणार आहे, असा निर्णय घेण्यात आला. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला (MEIT) प्ले स्टोअरवर फक्त कायदेशीर अॅप ठेवण्याचे काम देण्यात आले आहे. याशिवाय मनी लाँड्रिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या अशा खात्यांवरही RBI लक्ष ठेवणार आहे.


वित्त मंत्रालयाने नुकतेच एक निवेदन दिले आहे ज्यात असे सांगण्यात आले आहे की. RBI ने पेमेंट 'Aggregate' ची नोंदणी वेळेच्या आत पूर्ण करावी. त्यानंतर कोणत्याही नोंदणीकृत अॅप्सला काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही.