गुगलने आपल्या Pixel 8 सीरिजला भारतात लाँच केलं आहे. दरम्यान तुम्ही जर नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा फोन खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण या सीरिजवर आजपासून सेल सुरु होत आहे. या सीरिजमध्ये कंपनीने Pixel 8 आणि Pixel 8 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स पहिल्यांदाच सेलमध्ये उपलब्ध होत आहेत. तुम्ही फ्लिपकार्टवरुन हे स्मार्टफोन खरेदी करु शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Google Pixel 8 सीरिजमध्ये Tensor G3 प्रोसेसर मिळतो. या स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला फ्लॅट डिस्प्ले मिळेल, जो Corning Gorilla Glass Victus प्रोटेक्शनसह येतो. 


Google Pixel 8 सीरिजची किंमत आणि फिचर्स


Google Pixel 8 ला तुम्ही 75 हजार 999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करु शकता. Google Pixel 8 च्या 8GB RAM + 128GB स्टोरेजसाठी ही किंमत आहे. तसंच  8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 82 हजार 999 रुपये आहे. प्रो व्हेरियंट फक्त एका कॉन्फिगरेशनमध्ये येतो. 


Google Pixel 8 Pro च्या12GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 1,06,999 रुपये आहे. Pixel 8 वर तब्बल 8 हजारांचा डिस्काऊंट मिळत आहे. हा डिस्काऊंट ICICI, अॅक्सिस आणि कोटक बँकेच्या कार्डवर मिळत आहे. तर Pixel 8 Pro वर तब्बल 9 हजारांचा तात्काळ डिस्काऊंट मिळत आहे. 


याशिवाय Pixel 8 सीरीज खरेदी करणारे ग्राहक Google Pixel Watch 2 ला 19 हजार 990 रुपये किंवा Pixel Buds Pro 8,990 रुपयांत खरेदी करु शकतात. याशिवाय 4000 रुपयांचा एक्स्ट्रा एक्स्चेंज बोनसही उपलब्ध आहे. आज म्हणजेच 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजल्यापासून हा सेल सुरु झाला आहे. 


काय आहेत स्पेसिफिकेशन्स?


Google Pixel 8 Pro मध्ये 6.7 इंचाचा LTPO OLED डिस्प्ले मिळतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी Corning Gorilla Glass Victus 2 देण्यात आलं आहे. हा फोन Google Tensor G3 चिपसेटवर काम करतो. यामध्ये Titan M2 चिपसेटही मिळतो. हा स्मार्टफोन 12GB RAM आमि 128GB स्टोरेजसह उपलब्ध आहे. 


यामध्ये Android 14 देण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन 50MP + 48MP + 48MP च्या ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअपसह येतो.  फ्रंटला 10.5MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच 5050mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनला IP68 रेटिंग आहे. 


तर Pixel 8 मध्ये 6.2 इंचाच OLED डिस्प्ले मिळको, जो Corning Gorilla Glass Victus सह उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला प्रो व्हेरिएंटचाच प्रोसेसर मिळतो. हा फोन 50MP + 12MP च्या डुअल रेअर आणि 10.5MP च्या फ्रंट कॅमेरासह मिळतो. यामध्ये 4575mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 25W च्या चार्जिंगला सपोर्ट करते.