Discount Offer December 2024: 2024 मधील शेवटचा महिना सध्या सुरु आहे. अशातच अजूनही काही डीलर्सकडे 2023 चा स्टॉक शिल्लक आहे. हा स्टॉक कमी करण्यासाठी आता डीलर्स या कारवर काही प्रमाणात फायदा देताना दिसत आहेत. ज्यामध्ये टाटा हैरियर, सफारी, पंच, नेक्सन, टियागो, अल्ट्रोज आणि टिगोर या सर्व कारवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देण्यात आला आहे. टाटा कर्व सोडून ऑटोमेकर्स त्यांच्या सर्व ICE वेरिएंट्स कारवर ही ऑफर देत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कारवर मिळतोय 3.5 लाखांपेक्षा जास्त फायदा


टाटा हैरियर आणि सफारी या कारवर डिसेंबर 2024 मध्ये सर्वात जास्त सवलत देण्यात आली आहे. या कारच्या MY23 मॉडेलवर एकूण 3.7 लाख रुपयांपर्यंतचा फायदा तुम्हाला मिळत आहे. या प्रीमियम कारवर एक्सचेंज बोनस देखील देण्यात आला आहे. टाटाच्या या कारमधील MY24 मॉडेलवर 45 हजार रुपयांपर्यंतचा तुम्हाला मिळणार आहे. 


टाटा हैरियर आणि सफारी या दोन्ही कारवर 2 लिटर डिझेल इंजिन आहे.  जे 170 एचपी पॉवर देते. तसेच या कारच्या इंजिनसोबत 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्सही बसवण्यात आले आहेत. यामधील 5 सीटर कारची एक्स-शोरुम किंमत 14.99 लाख रुपयांपासून सुरु होते आणि 25.89 लाख रुपयांपर्यंत जाते. यामधील 3-रो सफारी कारची किंमत 15.49 लाख रुपये ते 26.79 लाख रुपये इतकी आहे. 


टाटा नेक्सनवर मिळतोय इतका डिस्काउंट 


टाटा नेक्सनच्या प्री-फेसलिफ्ट मॉडेलवर 2.85 लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळत आहे. यामधील फेसलिफ्ट मॉडेलवर 2.10 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. नेक्सनच्या MY24 मॉडेलवर 45 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात आला आहे. टाटा नेक्सन कारची एक्स-शोरुम किंमत 7.99 लाख ते 15.80 लाख रुपये इतकी आहे. यामधील CNG मॉडेलवर डिस्काउंट देण्यात आला नाहीये. 


टाटा पंचवर डिस्काउंट 


टाटा पंचच्या MY23 मॉडेलवर यावेळी 1.55 लाखांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. नोव्हेंबर महिन्यात या कारवर 40 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात आला होता. MY24 मॉडेलवर देखील 20 हजार रुपयांपर्यंत फायदा मिळत आहे. टाटा पंच या कारची एक्स शोरुम किंमत 6.13 लाख रुपयांपासून 10.15 लाख रुपयांपर्यंत आहे.