शाओमीचा Mi Max 2 फोन मिळतोय केवळ ९९९ रुपयांत
दिवाळीपूर्वी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्या विविध डिस्काऊंट आणि ऑफर्स सादर करत आहेत.
नवी दिल्ली : दिवाळीपूर्वी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्या विविध डिस्काऊंट आणि ऑफर्स सादर करत आहेत.
विविध प्रोडक्ट्सवर डिस्काऊंट, एक्सचेंज, कॅशबॅक ऑफर्स दिल्या जात आहेत. त्याचप्रमाणे फ्लिपकार्टवरही एक जबरदस्त ऑफर देण्यात येत आहे.
फ्लिपकार्टवर शाओमीचा Mi Max 2 हा स्मार्टफोनवर चांगली ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरमध्ये तुम्ही हा फोन केवळ ९९९ रुपयांत खरेदी करु शकणार आहात.
शाओमीने Mi Max 2 हा स्मार्टफोन जुलै महिन्यात लॉन्च केला होता. या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. मात्र, तुम्हाला ऑफरवर हा फोन ९९९ रुपयांत खरेदी करु शकता येणार आहे.
असा खरेदी करा ९९९ रुपयांत Mi Max 2
Mi Max 2 या स्मार्टफोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. मात्र, या फोनवर ११ टक्क्यांची सूट दिली जात आहे. त्यामुळे हा फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये होते. त्यानंतर फ्लिपकार्ट १४ हजार रुपयांची एक्सचेंज ऑफ देत आहे. म्हणजेच तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करत १४ हजार रुपयांपर्यंत खरेदी करु शकता. त्यामुळे तुम्हाला हा फोन केवळ ९९९ रुपयांत मिळणार आहे.
जर तुम्ही जुना फोन एक्सचेंज करु इच्छित नाहीयेत तरीसुद्धा तुम्हाला २ हजार रुपयांची सूट मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही Mi Max 2 हा फोन १४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करु शकता. हा फोन खरेदी करण्यावर नो कॉस्ट ईएमआयची ऑफरसुद्धा आहे. तुम्ही केवळ ७२८ रुपयांच्या मासिक हफ्ता देत हा फोन खरेदी करु शकता.
एक्सिस बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरुन पेमेंट केल्यास तुम्हाला १० टक्क्यांचा कॅशबॅक देणार आहे. यासोबतच ५ टक्के कॅशबॅक एक्सिस बँक Buzz क्रेडिट कार्डचा वापर केल्यास मिळणार आहे. तसेच PhonePe चा वापर करणाऱ्या ग्राहकांना २० टक्के कॅशबॅक देण्यात येणार आहे.